Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : राज्यातील रुग्णांमध्ये किंचित कमी पण पुण्याची स्थिती चिंताजनक

Spread the love

गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 5134 रुग्ण आढळून आले असले तरी  दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची  3296 इतकी आहे . राज्यातल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2,17,121 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 9250 वर गेला आहे . दरम्यान  राज्यातील Unlock नंतर Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली असली तरी मृत्यूदर फारसा वाढलेला नाही. राज्यातील रुग्णांच्या सुधारणेचा दर – 54.6% इतका असून कोविड मृत्यूदर – 4.26% असा आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या – 89,294 असून एकूण मृत्यूची संख्या – 9250  इतकी आहे.

दरम्यान देशाच्या मानाने महाराष्ट्राचा मृत्यूदराचा आलेख अजूनही चढता आहे. देशाचा विचार केला तर सरासरी कोविड मृत्यूदर 2.98 वर आला आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून नवीन रुग्ण हे 20 हजारांच्या वर आहे. गेल्या 24 तासांतही 24 हजार 248 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 425 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 7 लाखांच्या घरात गेला आहे. सध्या देशात 6 लाख 97 हजार 413 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 2 लाख 53 हजार 287 सक्रीय रुग्ण आहेत. तर 4 लाख 24 हजार 433 रुग्ण कोरोनमुक्त  झाले आहेत. तर, एकूण मृतांची संख्या 19 हजार 693 झाली आहे.

दरम्यान जगभरातील इतर देशांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारताने  रशियाला मागे टाकले आहे. याचबरोबर भारताचा पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी ही गेल्या काही दिवसांत सर्वात जास्त आहे. देशाचा पॉझिटिव्ह रेट हा 13.42 % आहे. तर मृत्यूदरही वाढत आहे. राज्यात मुंबईत कोरोनारुग्ण अधिक पण साथ नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. विशेष समाधानाची बाब म्हणजे सर्वाधिक प्रादुर्भावाची भीती असणाऱ्या धारावीमध्ये आज दिवसभरता फक्त एक रुग्ण सापडला. मुंबईत दिवसभरात सर्वात कमी रुग्ण सापडले आहेत.

धक्कादायक म्हणजे पुण्यात मात्र  कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर माजी महापौर आणि आमदार मुक्ता टिळक यांना लागण झाल्याचं वृत्त आहे. इतरही काही पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना संसर्ग झाल्याने आता राजकीय वर्तुळात कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!