AurangabadCoronaUpdate : दुःखद बातमी : शिवसेनेचे नगरसेवक नितीन साळवी यांचे निधन

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद आणि जिल्ह्यात कोरोनाचा कहर चालूच असून या संसर्गाला थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वानुमते बैठक घेऊन दि . १० ते १८ जुलै दरम्यान जनता कर्फ्यूचा निर्णय जाहीर केला आहे . दरम्यान कोरोनाने आज शहरातले शिवसेनेचे नगरसेवक नितीन साळवी यांचा बळी घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.  गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची झुंज अखेर संपली आणि त्यांचे निधन झालर. ते बालाजी नगर वॉर्डातून निवडून आले होते.

Advertisements

दुपारचे कोरोना अपडेट

जिल्ह्यात 3245 रुग्णांवर उपचार सुरू : 37 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी ग्रामीण भागातील 37 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये 24 पुरूष, 13 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 7134 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 3571 रुग्ण बरे झालेले आहेत. 318 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने 3245 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Advertisements
Advertisements

ग्रामीण भागातील रूग्ण : (37)

सारा किर्ती, वडगाव (2), पाटोदा (2), अयोध्या नगर, बजाज नगर, वडगाव कोल्हाटी (1), गणपती विसर्जन विहार, बजाज नगर (1), मनजित प्राईड सिडको, बजाज नगर (3), सर्वोदय सो., बजाज नगर (1), तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (2), साई प्रतीक्षा अपार्टमेंट, बजाज नगर (1), विश्वविजय हाऊसिंग सो., बजाज नगर (1), बजाज नगर (3), सिडको महानगर (1), जय भवानी चौक, बजाज नगर (1), साक्षी नगरी, बजाज नगर (2), द्वारकानगरी, बजाज नगर (3), कृष्ण कोयना सो., बजाज नगर (2), संगम नगर, वडगाव (1), नीलकमल सो., बजाज नगर (1), रांजणगाव, बजाजनगर (2), हडको, बजाज नगर (1), कन्नड बाजारपेठ (1), तहसील क्वार्टर, कन्नड (1), विहामांडवा, पैठण (1), पळसखेडा, सोयगाव (2), रांजणगाव, गंगापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

आपलं सरकार