CoronaWorldUpdate : चीनने अमेरिका आणि जगाचे मोठे नुकसान केले , ट्रम्प यांचा चीनवर पुन्हा प्रहार

Advertisements
Advertisements
Spread the love

संपूर्ण जग  कोरोनामुळे त्रस्त असताना आणि कोरोनाच्या साथीचा संसर्ग  वाढत असताना पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी  सोमवारी पुन्हा एकदा चीनवर टीका करताना आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, चीनने अमेरिका आणि संपूर्ण जगाचे बरेच नुकसान केले आहे.

Advertisements

दरम्यान याच वादामुळे दोन्ही देशांमध्ये आर्थिक पातळीवर युद्ध सुरू आहे, तर दक्षिण चीनमध्येही दोन्ही देशांचे नौदल समोरासमोर आहे. चीनपासून पसरलेल्या या साथीचा परिणाम अमेरिकेला सर्वाधिक झाला आहे आणि यामुळे त्यांची यंत्रणा देखील कोलमडली आहे. यामुळे ट्रम्प सतत चीनवर टीका करत आहेत. ट्रम्प यांनी यापूर्वी अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी म्हटले होते की जेव्हा काही देशांकडून कोट्यवधी डॉलर्स अमेरिकेच्या तिजोरीत येत होते, त्याच वेळी चीनकडून व्हायरसचा फैलाव झाल्याचा परिणाम देशाला झाला होता.

Advertisements
Advertisements

ट्रम्प या पूर्वीही म्हणाले होते की, “अमेरिकेत गाऊन, मास्क आणि शस्त्रक्रिया वस्तू बनविल्या जात आहेत, ज्यापूर्वी केवळ परदेशी देशात, विशेषत: चीनमध्ये या वस्तू बनविल्या जात होत्या जेथून हा व्हायरस आणि इतर गोष्टी आल्या आहेत. हा आजार जगभर पसरत असल्याने चीनने हा रोग लपविला. यासाठी चीनला पूर्णपणे जबाबदार धरले पाहिजे.

आपलं सरकार