CoronaCurrentUpdate : NewsInOneView : भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर , इंग्लंड ८ तर चीन २२ व्या क्रमांकावर….

Advertisements
Advertisements
Spread the love

Maharashtra  Active Cases : 86057 |Discharge : 111740 | Death : 8822 |Total : 206619


India Coronavirus Cases: 698233 | Deaths: 19703 (4%) | Recovered: 424928 (96%) | Active : 253287

(Source : https://www.worldometers.info/coronavirus/) 

Advertisements

India Coronavirus Cases: 697413 | Deaths: 19693 (4%) | Recovered: 424433 (96%) | Active : 253287

( Source : https://www.mohfw.gov.in/ )

Advertisements
Advertisements

World Coronavirus Cases 11,563,004 | Deaths: 536843 (8%) | Recovered: 6537765 (92%)


1. USA : 2982928 | 132569| 2. Brazil : 1604585| 64900 3. India : 698233 | 19703  4. Russia : 681251 | 10161 5. Peru : 302718 | 10589  6. Spain 7. Chile 8. UK : 296857 | 41736  22. Chin


देशात करोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आजची आकडेवारी देशाची चिंता वाढवणारी आहे. www.worldometers.info आणि Covid19india.org  या संस्थेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक करोना बाधित रुग्णांची संख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारताच्या आधी रशिया तिसऱ्या स्थानी होता.


या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून, दुसऱ्या स्थानी ब्राझील आहे. वरील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनुसार पाचव्या स्थानी असलेला इंग्लंड आठव्या स्थानी गेला असून ज्या देशातून कोरोनाची सुरुवात झाली तो चीन आता २२ व्य क्रमांकावर गेला असल्याचे चित्र आहे. दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या पाहता महाराष्ट्राचा क्रमांक पहिला असल्याचे निदर्शनास येत आहे.  त्यानुसार एकूण रुग्णांपैकी दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. दरम्यान या आकडेवारीने  भारताच्या चिंतेत भर टाकली असली तरी रुग्णवाढीचा दर अधिक असून मृत्यू दर कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार रविवारीच भारत रशियाला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. www.worldometers.info आणि Covid19india.org च्या माहितीनुसार भारतातील रुग्णांची संख्या वाढून रविवारी ६ लाख ९० हजार ३९६ इतकी झाली. तर जॉन हॉपकिंन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार रशियातील करोना बाधित रुग्णांची संख्या ६ लाख ८० हजार २८२ इतकी झाली आहे.

ताज्या माहितीनुसार  सध्या अमेरिका २९८२९२८ रुग्णसंख्येसह पहिल्या स्थानावर असून, ब्राझील १६०४५८५ रुग्णांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या व दुसऱ्या स्थानावर असलेल्या अमेरिका व ब्राझीलमधील करोना बाधिताच्या रुग्णसंख्येत व भारतातील रुग्णसंख्ये मोठे  अंतर असले , तरी गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याच प्रमाण कमालीचे वाढले आहे. जून महिन्याच्या अखेरच्या १२ दिवसातच देशात २ लाख रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे या आकडेवारीने  भारताच्या चिंतेत भर टाकली असली तरी रुग्णवाढीचा दर अधिक असून मृत्यू दर कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

आपलं सरकार