Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांच्या दिशेने , रुग्ण बरे होण्याचा दर ५४. २४ टक्के

Spread the love

राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २ लाखावर पोहोचत आहे. २४ तासांत राज्यात काल दिवसभरात ६ हजार ३६४ नवीन रुग्णांची नोंद झाल्यानं चिंता अधिक वाढली आहे. एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या आता १ लाख ९२ हजार ९९० झाली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान काल राज्यात आज १९८ जणांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. यापैकी १५० मृत्यू हे मागील ४८ तासांमधील आहेत तर, उर्वरित ४८ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. तर, सध्या राज्याचा मृत्यूदर ४. ३४ टक्के इतका आहे. आज नोंदवलेल्या मृत्यूंपैकी ठाणे मनपातील २३, सोलापूर मनपा- १०, पनवेल- ३, कल्याण डोंबिवली-२, उल्हासनगर-२, भिवंडी-१, मीरा भाईंदर-१ वसई-विरार-१, रायगड-१, अहमदनगर-१, जळगाव-१, पिंपरी-चिंचवड-१ आणि अमरावती-१ यांचा समावेश आहे.

दिलासादायक बाब म्हणजे काल राज्याच्या विविध रुग्णालयातून ३ हजार ५१५ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळं राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ०४ ६८७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर, रुग्ण बरे होण्याचा दर ५४. २४ टक्के इतका आहे. विविध रुग्णालयात ७९ हजार ९११ इतक्या रुग्णावर उपचार सुरू आहेत. राज्यात करोनाच्या निदान चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आलं आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १० लाख ४९ हजार २७७ नमुन्यांपैकी १ लाख ९२ हजार ९९० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या राज्यात ५ लाख ८९ हजार ४४८ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ४२ हजार ३७१ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!