Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : मोटरसायकल आडवी लावून १९ लाखांची लूटमारीचा बनाव दोघे अटकेत

Spread the love

औरंगाबाद – रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराला हाताशी धरुन साडेचार लाख रु.ची जनावरे आणि १५ लाखांचा आयशर टेंपो लूटण्याचा बनाव करणार्‍या दोघांना ग्रामीण गुन्हेशाखेने मुद्देमालासह अटक केली.

कुख्यात सचिन तायडे आणि त्याच्या दोन साथीदारांनी १५गायी म्हशी वाहून नेणारा आयशर टेंपो ३जुलै रोजी सकाळी ६वा.दौलताबाद कडे येत असतांना नाशिक रोडवरील पिंपळगाव फाटा येथे आयशर गाडीच्या चालक आणि क्लिनरला मारहाण करंत लूटल्याचा गुन्हा सिल्लेगाव पोलिस ठाण्यात ४जुलै रोजी दाखल झाला हौता.
या प्रकरणात टेंपोचालक अमजद अहमद कुरेशी रा.बडातकीया नूतन काॅलनी आणि मंगेश प्रल्हाद पोळ रा.गवळीपुरा छावणी या दोघांना पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी संशयावरुन अटक केली. वरील दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

जबाबात माहिती देतांना आरोपींनी सांगितले की,अब्दी मंडी येथील जनावरांचे व्यापारी आसाराम वरकड यांनी देवगाव रंगारी येथून जनावरे खरेदीकेले होते. व नूतन काॅलनीतील अब्दुल अमीन कुरेशी(३०) यांच्या टेंपोतून दौलताबादला नेत होते.त्या टेंपोचे चालक अमजद व क्लिनर मंगेश पोळ होते.सचिन तायडे ने १५जनावरे आणि आयशर टेंपो हवाली करण्यासाठी अटक आरोपींना प्रत्येकी २० हजार रु.देण्याचे कबुल केले होते. त्यामुळे अमजद आणि मंगेश पोळने बनाव रचंत १९लाखांची लूटमार झाल्याचे दाखवले. ग्रामीण गुन्हेशाखेने अमजद आणि मंगेश पोळची चौकशी करतांना दोघांच्याही बोलण्यात तफावत आली होती.म्हणून पोलिस निरीक्षक फुंदे यांचा संशय बळावला व आरोपींना अटक करताच गुन्हा उघडकीस आला.वरील कारवाई पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पीएसआय भगतसिंग दुलंत पोलिस कर्मचारी दिपेश नागझरे, बाबासाहेब नवले, बबन गायकवाड यांनी पार पाडली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!