Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UttarPradeshNewsUpdate : कानपुर पोलीस ठाण्यातील थरार , गुंडाच्या पोलीस ठाण्यावरील हल्ल्यात डीएसपीसह ८ पोलीस ठार

Spread the love

उत्तर प्रदेशाच्या कानपूर शहरातील पोलिसांवर अज्ञातांनी भ्याड हल्ला करत गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये डीएसपीसह ८ पोलीस ठार झाले असून एसओ बिथूर यांच्यासह ६ पोलीस गंभीर जखमी आहेत. सर्व जखमी पोलिसांची प्रकृती गंभीर असल्याने  त्यांना उपचारासाठी रीजेंसी रुग्णालयात दाखल करण्यात आले  आहे. या प्रकरणी एसटीएफ  आणि पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. आज शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे कानपूर शहर हादरून गेलं आहे.


या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, यूपीमधील अनेक जिल्ह्यांमध्ये विकास दुबे विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या ५२ हून अधिक खटले त्याच्याविरुद्ध सुरू आहेत. त्याला अटक करण्यात मदत करणाऱ्याला पोलिसांनी २५ हजारांचे  बक्षीस ठेवले होते. खून आणि खुनाचा प्रयत्न या प्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास दुबे नावाच्या व्यक्तीसह त्याच्या साथीदारांनी पोलिसांच्या या  पथकावर भ्याड हल्ला करून  या हल्ल्यानंतर त्यांनी पोलीस चौकीतील सर्व साहित्य लुटले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच एडीजी कानपूर झोन, आयजी रेंज एसएसपी कानपूर यांच्यासह उत्तर प्रदेशातील पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले  आहेत.  हत्या करण्यासाठी आलेल्या अज्ञातांनांकडून सलग गोळीबार सुरू होता. या गोळीबाराला पोलीस दलानं प्रत्युत्तर दिले. ७ ते ८  जणांनी मिळून हा हल्ला केला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या धक्कादायक घटनेचा हिस्ट्रीशीटर विकास दुबेचा मोठा गुन्हेगारी इतिहास आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लहानपणापासून तो गुन्हेगारी विश्वाशी संबंधित आहे. गुन्हेगारीच्या क्षेत्रात नाव व्हावे या उद्धेशाने त्याने आपली गँग बनवून त्या मार्फत तो चोरी, दरोडे, खून असे प्रकार करू लागला. दरम्यान  त्याने राजकारणात येण्याचाही प्रयत्न केला. पण ते त्याला शक्य झालं नाही. विकासला अनेक वेळा अटक करण्यात आली. एकदा लखनऊमध्ये एसटीएफनंही त्याला ताब्यात घेतलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्य सिद्धेश्वर पांडे यांच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. खरंतर, अनेक निवडणुका आणि राज्यातील सर्व प्रमुख पक्षांशी संबंधातील अनेक नेत्यांसाठी काम त्याने मोठी कामं केली आहेत. २००१मध्ये विकास दुबे याने भाजप सरकारमधील राज्यमंत्री संतोष शुक्ला यांना पोलीस स्टेशनमध्ये घेरलं आणि गोळ्या घालून ठार केलं. या हायप्रोफाईल हत्येनंतर तो शिवलीच्या डॉन नावाने प्रसिद्ध झाला. अनेक गुंत्यात हव्या असणाऱ्या विकासाने स्वतः न्यायालयात आत्मसमर्पण केलं आणि काही महिन्यांनंतर जामिनावर बाहेर आला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!