Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PoliticsOfMaharashtra : भाजपच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा , खडसे , तावडे विशेष निमंत्रित तर पंकजा मुंडे यांची जबाबदारी निश्चित नाही…

Spread the love

भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी ही घोषणा केली. दर तीन वर्षानी स्थानिक पातळी ते राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक बदल होतात त्यानुसार नव्या नियुक्त्या जाहीर होत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांमध्ये पक्षात अनेक नेते नाराज होते. त्यामुळे ही कार्यकारिणी कशी असेल याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती. दरम्यान नाराज असलेल्या पंकजा मुंडें यांना पक्षाच्या पातळीवर केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाणार आहे असं पाटील यांनी सांगितलं. तर एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना फक्त विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आलं आहे.

यात  १२ प्रदेश उपाध्यक्ष, ५ सरचिटणीस,१ महामंत्री संघटन, १ कोषाध्यक्ष, १२ सचिव, ७ मोर्चांचे अध्यक्ष, कार्यकारी सदस्य ७९ असणार आहेत. पक्षाचे पदाधिकारी असे आहेत. सरचिटणीस – सुजीतसिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, उपाध्यक्ष – राम शिंदे, चित्रा वाघ, कपील पाटील, प्रसाद लाड, माधव भांडारी, सुरेश हळवणकर, प्रीतम मुंडे, मुख्य प्रतोद – आशीष शेलार  प्रतोद माधुरी मिसाळ, महिला मोर्चा – उमा खापरे, युवा मोर्चा – विक्रांत पाटील

नाराज असलेले एकनाथ खडसे, विनोद तावडे यांना कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आलं आहे. तर रक्षा खडसेंना कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांना नेमकी कुठली जबाबदारी देण्यात येणार आहे याचा खुलासा त्यांनी केलेला नाही. त्यांना भाजपच्या कोअर कमेटित स्थान असेल असंही त्यांनी सांगितलं. तर उमेदवारीे नाकारलेले चंद्रशेखर बावनकुळे यांना सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षात कायम कुणीही नाराज नसतो असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!