Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांचे निधन

Spread the love

बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांचं मुंबईत निधन झालं आहे. त्यांना श्वासाचा त्रास होत असल्यानं  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मध्य रात्रीच्या सुमारास त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी सरोज यांची कोरोना टेस्टही करण्यात आली होती. या कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. 72 व्या वर्षी सरोज खान यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी माधुरी दीक्षित, श्रीदेवी यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचे नृत्य दिग्दर्शित केलं होतं.

सरोज खान यांनी  बॉलिवूडमध्ये हिट गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले  आहे. त्यांच्या शिकवलेल्या नृत्यामुळे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचं करिअर झालं आहे. 1983 साली त्यांनी ‘हिरो’ चित्रपटात नृत्यदिग्दर्शन केले. नृत्यदिग्दर्शक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट ‘कलंक’ हा आहे. याशिवाय त्यांनी मिस्टर इंडिया, चांदणी, बेटा,  तेजाब, नागीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया, परदेश, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथिया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरू, नमस्ते लंडन, जब वी मेट, एजंट विनोद, राउडी राठौर, एबीसीडी, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका ” या चित्रपटांसाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!