Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : जैन इंटरनॅशनल स्कूलची जबरन फीस वसुली, झेड.पी.कडे तक्रार, गोंदवलेंनी दिले चौकशीचे आदेश

Royalty-free stock illustration of an African-American little boy with dark curly hair, holding his backpack with one hand and staring at his watch, sweating with anxiety as he is late for school.

Spread the love

औरंगाबाद – शहानूरवाडी जबींदा टाऊन परिसरात असलेल्या दि जैन इंटरनॅशनल स्कूलने पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यार्थ्यांना नियमबाह्य फीस आकारल्या प्रकरणी मिळालेल्या तक्रारी प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले यांनी शिक्षणविभागाला शाळेच्या चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करण्यास सांगितला आहे.अशी माहिती सीईओ गोंदवले यांनी महानायक शी बोलतांना दिली.
सातारा परिसरात राहणारे अमित कासलीवाल,सुदेश चुडीवाल, स्वप्नील चांदीवाल, प्रिया बनसोडे या पालकांनी जिल्हा परिषदेकडे सीईओ मंगेश गोंदवले यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार आज दिली.
तक्रारीत जैन इंटरनॅशनल स्कूलच्या कर्मचार्‍यांनी नियमबाह्य फीस वसूल करंत पालकांशी उध्दट वर्तन केल्याचा उल्लेख केला आहे.
दोनच दिवसांपूर्वी जिल्हापरिषदेतील शिक्षण विभागाने पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण घेण्यासाठी फीस आकारल्यास शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल.असे आदेश बजावले आहेत.त्याच बरोबर शाळेकडून फीस संदर्भात त्रास सहन केलेल्या पालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार करावी असेही नमूद केले आहे. याबाबत चे वृत्त प्रसारित होताच सातारा परिसरातील काही नागरिकांनी सातारा पोलिसांकडे तक्रार केली.पोलिसही या प्रकरणी चौकशी करंत असल्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!