Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrime : तडीपारी संपताच घरफोडी, चोवीसतासात छडा, मुद्देमाल जप्त

Spread the love

औरंगाबाद -शरीफ काॅलनीत राहणार्‍या घरफोड्याने तडीपारी संपल्यानंतर आपल्या काॅलनीतील आजारी माणसाची सुष्रुशा करण्यासाठी आलेल्या जावायाच्या घराचा पत्ता शोधंत किराडपुर्‍यातील बंद घरफोडून तीन तोळे २ग्रॅम सोने लंपास केल्यानंतर अवघ्या चोवीस तासात जिन्सी पोलिसांनी चोरट्याला बेड्या ठोकल्या.व मुद्देमाल जप्त केला.
जिन्सी पोलिसांची तडीपारी संपलेला सय्यद हनीफ सय्यद हबीब(२२) रा.शरीफ काॅलनी असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी राहात असलेल्या शरीफ काॅलनीत आजारी सासर्‍याची सुष्रुशा करण्यासाठी अहमदखान साहबखान पठाण (४७) धंदा केबल आॅपरेटर रा. किराडपुरा हे घराला कुलुप लावून शरीफ काॅलनीत काही दिवसांसाठी राहण्यास आले होते. तडीपारी संपलेल्या सय्यद हनीफ ने हा प्रकार शोधुन अहमदखान चे घर फोडून ३२ग्रॅम सोन्याचे दागिने ज्याची किंमत १लाख ३१हजार रु. असा ऐवज कपाटातून चोरुन नेला. १जुलै रोजी अहमदखान पाणी भरण्यासाठी किराडपुर्‍यात घरी परतले असता त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले.त्यांनी तात्काळ जिन्सी पोलिसांकडे तक्रार देताच पीएसआय दत्ता शेळके यांना खबर्‍याने अट्टल गुन्हेगार सय्यद हनीफ तडीतपारी संपवून फिरंत असल्याची माहिती दिली.पीएसआय शेळके यांनी सय्यद हनीफ ला ताब्यात घेत चौकशी केली असता आरोपी हनीफ ने घरफोडीची कबुली देत मुद्देमाल जप्त केला. पीढील तपास पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शरंद जोगदंड,पीएसआय दत्ता शेळके, पोलिस कर्मचारी रफी शेख, संपत राठोड, हारुण शेख करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!