AurangabadNewsUpdate : पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – मुकुंदवाडीतील तरुणाने पाच दिवसांपूर्वी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणी शेजारील पाच जणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
ॠषीकेश कापसे रा. अहिल्यानगर मुकुंदवाडी असे मयताचे नाव आहे. ॠषीकेश ने २८जून रोजी संध्याकाळी ८च्या सुमारास साडी पंख्याला बांधून आत्महत्या केली होती. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली होती. या प्रकरणाचा तपास सुरु असतांना मयताच्या शेजारील
आकाश कावळे, अर्जून निरवे, अंजू निरवे, सिंधू गायकवाड, मंगल खंडागळे यांनी मयत ॠषीकेशला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे अपमान सहन न झाल्राने ॠषीकेशने आत्महत्या केली.हा प्रकार तपासात उघंड झाल्यावर मयताची आई रेणूका कापसे यांच्या तक्रारीवरुन वरील गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदवाडी पोलिस करंत आहेत

Advertisements

आपलं सरकार