AurangabadCoronaUpdate 6043 : औरंगाबादकरांनो गंभीर व्हा, विनाकारण बाहेर पडू नका, आज दिवसभरात २६१ रुग्णांची भर….

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2969 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज 112 जणांना सुटी दिलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 65, ग्रामीण भागातील 47 जणांचा समावेश आहे. आज एकूण 261 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 181, ग्रामीण भागातील 80 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये 153 पुरूष, 107 महिला व अन्य एक आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 6043 कोरोनाबाधित आढळले आहेत, तर 279 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 2795 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
सायंकाळनंतर आढळलेल्या 12 रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्णसंख्या आहे.) आहे. यामध्ये दहा पुरूष आणि दोन महिला रुग्णांचा समावेश आहे.

Advertisements

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (8)

कांचनवाडी (1), मोमीनपुरा (1), हनुमान नगर (1), नवाबपुरा(1) एमजीएम क्वार्टर परिसर (1), भानुदास नगर (1), मनपा परिसर (1), एन सहा, सिडको, मथुरा नगर (1)

Advertisements
Advertisements

ग्रामीण भागातील रुग्ण (4)

रायगाव, कन्नड (2), पैठण (1), तोंडुली, पैठण (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) एक जुलै रोजी रांजणगावातील 50 वर्षीय् पुरूष, शहरातील बेगमपु-यातील 69 वर्षीय् स्त्री, एन सहा, अविष्कार कॉलनीतील 55 वर्षीय् पुरूष, हर्ष नगर 70 वर्षीय् स्त्री, सिल्लोडमधील 47 वर्षीय पुरूष, एन अकरा मधील सुभाषचंद्र बोस नगरातील 71 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत घाटीत 217 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 212 कोरोनाबाधित औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते. तर शहरातील खासगी रुग्णालयात शहागंजमधील 71 वर्षीय पुरूष, तानाजी नगरातील 56 वर्षीय पुरूष रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे आतापर्यंत घाटीत औरंगाबाद जिल्ह्यातील 212, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये 66, मिनी घाटीमध्ये 01 अशा एकूण 279 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

आपलं सरकार