Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : भारत सरकारकडून टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी

Spread the love

भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर घातली बंदी आहे. टिकटॉकसह युसी ब्राउजर, कॅम स्कॅनरसह आणखी अनेक लोकप्रिय अॅपवर भारताने बंदी घातली आहे. याआधी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी चायनीज अॅप्सची एक यादी तयार केली होती. केंद्र सरकारने या अॅपवर बंदी घालावी किंवा हे अॅप मोबाइलवरून तात्काळ हटवण्यास नागरिकांना सूचना द्याव्यात, अशी मागणी सुरक्षा यंत्रणांनी सरकारकडे केली होती. यानंतर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. ५९ चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.

सरकारच्या माहितीनुसार बंदी घातलेल्या अॅप्सविरोधात अनेक तक्ररी येत होत्या. हे अॅप्स देशाचे सार्वभौमत्व, सुरक्ष आणि अखंडतेसाठी घातक बनत चालले होते. चीन या अॅप्सद्वारे भारतीयांच्या डेटाशी छेडछाड करू शकत होता. यामुळे भारताच्या गुप्तचर संस्थांनी धोकादायक अॅप्सची यादी तयार करून ती केंद्र सरकारला आधीच दिली होती. यानंतर केंद्र सरकारने आपल्या स्तरावर या अॅप्सची माहिती घेतली. हे अॅप्स धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्र सरकारने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. दरम्यान भारतात टिकटॉकचे जवळपास २० कोटी युजर्स असल्याचे  सांगण्यात येत असून हि संख्या युट्युबच्या युजर्सहून अधिक आहे. तर हेलो अॅपचे भारतात ४० हजार युजर्स आहेत. वुई मेट, शेअर इट, युसी ब्राउजर्स, क्लब फॅट्री, युसी न्यूज, झेंडर, लाइक, सीएम ब्राउजर्स, शीन, न्यूजडॉग, वंडर कॅमेरा, कॅम स्कॅनर, क्लिन मास्टर-चिता मोबाइल, फोटो वंडर, क्यूक्यू प्लेअर, स्वीट सेल्फी, हेलो, यू व्हिडिओ, मोबाइल लेजंड्स अशा एकूण ५९ अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान भारत सरकारने याधी चिनीमधून होणाऱ्या थेट परकिय गुंतवणुकीवर निर्बंध घातले आहेत. चीनमधून भारतात गुंतवणूक करण्यासाठी सरकारची अधिकृतरित्या परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे चीनला झटका बसला आहे. तर दुसरीकडे भारत सरकार चिनीमधील निकृष्ट दर्जाच्या वस्तुंच्या आयातही बंद करण्याच्या विचारात आहेत. या वस्तुंची यादीही सरकारला देण्यात आली आहे. चीनशी होणारा व्यापारी तोटा खूप मोठा आहे. यामुळे भारत सरकार यापुढे आणखी महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!