Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५२ टक्क्यांवर कायम, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती

Spread the love

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसचे नवे 4878 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे  महाराष्ट्राचा एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा पावणेदोन लाखांपर्यंत पोहोचला असला तरी बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत 174761 पैकी 90,911 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  महाराष्ट्राचा कोविड मृत्यूदर भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेत अजूनही जास्तच आहे. गेल्या 48 तासांत 95 तर आधीच्या काही दिवसांतले मिळून 150 असे 245 कोरोना मृत्यू आज राज्यात नोंदले गेले.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार  आज दिवसभरात 4878 रुग्ण नव्याने दाखल झाले, तर 1951 रुग्णांना बरं होऊन डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेटसुद्धा थोडासा सुधारला आहे. राज्यात सध्या 75,979 अॅक्टिव्ह कोरोनारुग्ण आहेत. मुंबई महानगर भागातच यातले 50 हजारहून अधिक रुग्ण आहेत. तर पुणे परिसराचा आकडा 10 हजारांच्या पुढे आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या महानगरांसह 12 जिल्ह्यांमध्ये उद्यापासून लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दिली.

राज्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 74 हजार 761 रुग्ण कोविड पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 75,979 आहे. तर राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण – 52.02 टक्के असून मृत्यूदर – 4.49 टक्के आहे. सध्या राज्यात 5,78,033 लोक होम क्वारंटाइन आहेत. 38,866 संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी 30 हून अधिक दिवसांवर गेला आहे.

मागील 48 तासात झालेले 95 मृत्यू हे मुंबई मनपा-36, ठाणे-3, ठाणे मनपा-9, कल्याण-डोंबिवली मनपा- 4, भिवंडी निजामपूर मनपा-3, वसई-विरार मनपा-2, नाशिक-2, नाशिक मनपा-1, जळगाव-5, पुणे-1, पुणे मनपा-5, पिंपरी चिंचवड मनपा-3, सोलापूर मनपा-2, कोल्हापूर-1, रत्नागिरी-1, औरंगाबाद-2, औरंगाबाद मनपा-11, लातूर-1,अकोला-2, अकोला मनपा-1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (७७,६५८), बरे झालेले रुग्ण- (४४,१७०), मृत्यू- (४५५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८,९२४)

ठाणे: बाधित रुग्ण- (३७,६३०), बरे झालेले रुग्ण- (१५,०४२), मृत्यू- (९५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,६३१)

पालघर: बाधित रुग्ण- (५८५८), बरे झालेले रुग्ण- (२६२१), मृत्यू- (१०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१२९)

रायगड: बाधित रुग्ण- (४२५४), बरे झालेले रुग्ण- (२१२७), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०२३)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (५९५), बरे झालेले रुग्ण- (४३५), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३३)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२१९), बरे झालेले रुग्ण- (१५४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१)

पुणे: बाधित रुग्ण- (२२,३२७), बरे झालेले रुग्ण- (११,२७०), मृत्यू- (७५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,३०५)

सातारा:  बाधित रुग्ण- (१०७६), बरे झालेले रुग्ण- (७२४), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०८)

सांगली: बाधित रुग्ण- (३७६), बरे झालेले रुग्ण- (२१७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४८)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८४६), बरे झालेले रुग्ण- (७११), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२४)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२६५१), बरे झालेले रुग्ण- (१४७३), मृत्यू- (२६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१२)

नाशिक: बाधित रुग्ण- (४२२६), बरे झालेले रुग्ण- (२२३२), मृत्यू- (२२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७७२)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (४३१), बरे झालेले रुग्ण- (२७३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४४)

जळगाव: बाधित रुग्ण- (३४१५), बरे झालेले रुग्ण- (१९१६), मृत्यू- (२३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६५)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१७५), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६)

धुळे: बाधित रुग्ण- (१०९४), बरे झालेले रुग्ण- (५४४), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९४)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (५३२८), बरे झालेले रुग्ण- (२३४९), मृत्यू- (२५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७२३)

जालना: बाधित रुग्ण- (५५२), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०४)

बीड: बाधित रुग्ण- (११८), बरे झालेले रुग्ण- (९१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)

लातूर: बाधित रुग्ण- (३३१), बरे झालेले रुग्ण- (१९१), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२)

परभणी: बाधित रुग्ण- (९९), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२७०), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

नांदेड: बाधित रुग्ण- (३४४), बरे झालेले रुग्ण (२३१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२१५), बरे झालेले रुग्ण- (१६९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६)

अमरावती: बाधित रुग्ण- (५६६), बरे झालेले रुग्ण- (४११), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२४)

अकोला: बाधित रुग्ण- (१५३६), बरे झालेले रुग्ण- (९७३), मृत्यू- (७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८६)

वाशिम: बाधित रुग्ण- (१०२), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२४५), बरे झालेले रुग्ण- (१४५), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२८५), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)

नागपूर: बाधित रुग्ण- (१४६८), बरे झालेले रुग्ण- (११४४), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०९)

वर्धा: बाधित रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६)

भंडारा: बाधित रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१२३), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (५५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (८९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६)

एकूण: बाधित रुग्ण-(१,७४,७६१), बरे झालेले रुग्ण-(९०,९११), मृत्यू- (७८५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१६),ॲक्टिव्ह रुग्ण-(७५,९७९)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!