AurangabadUpdate : आईवर रुसून गेलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला 

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : आई रागावल्याच्या कारणातून दोन दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेल्या युवकाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. अमोल तुळशीराम गुंजाळे (१९, रा. हनुमान मंदिराजवळ, जमनज्योती, हर्सुल) असे या युवकाचे नाव आहे. तुळशीराम गुंजाळे यांचे कुटुंब हनुमान मंदिराजवळ राहते. शनिवारी दुपारी तुळशीराम गुंजाळे यांच्या पत्नीने मुलगा अमोलला शेतात फवारणी का करीत नाही, या कारणावरून रागावले. रागाच्या भरात अमोल घरातून निघून गेला. रात्र झाली तरी तो घरी परतला नसल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला. शनिवारी रात्री कोठेही आढळून न आल्याने रविवारी हर्सुल पोलीस ठाण्यात अमोल हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली. सोमवारी सकाळी शेताच्या बाजुला असलेल्या विहिरीत अमोलचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस आणि नागरिकांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ उबाळे करीत आहेत.

Advertisements

Leave a Reply

आपलं सरकार