Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrime : खून करण्याचा प्रयत्न, चौघे अटक

Spread the love

औरंगाबाद – कैलासनगर परिसरात दादागिरी करणार्‍या इसमाला चौघांनी फावडे आणि चाकूने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करंत चौघांना बेड्या ठोकल्या.
काल(सोमवारी ) दुपारी ४च्या सुमारास योगेश मुळे (३८) रा. कैलासनगर याला कैलासनगर परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरुन चार जणांनी फावडे आणि चाकूने मारहाण केली.यात जखमी मुळे अत्यवस्थ झाल्यामुळे त्याला त्वरीत परिसरातील नागरिकांनी घाटी रुग्णालयात नेले.काल तेथील डाॅक्टरांनी योगेश मुळेची शस्रक्रिया केली.त्यामुळे तो बेशुध्द होता. आज शुध्दीवर आल्यावर पोलिसांनी जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला.
शुभम शर्मा(२४) सुमित शर्मा(१९) दोघेहि रा कैलासनगर सुरज गायकवाड(२०) अजय गाट(२२) दोघेही रा.बायजीपुरा अशी अटक आरोपींची नावे आहेत. यापूर्वीही दोन तीन वेळेस जखमी मुळे आणि आरोपींची भांडणे झाली होती. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय शरद जोगदंड करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!