दुनिया : पाकिस्तानात शेअर बाजार इमारतीवर दहशतवादी हल्ला, चार दहशतवादी ठार

Advertisements
Advertisements
Spread the love

सोमवारी सकाळी पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्सचेंजवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त येताच पाकिस्तानात खळबळ उडाली आहे आहे. पोलीस आणि रेंजर्सची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. परिसरातून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर अद्यापही चकमक सुरू आहे. कराची येथील शेअर बाजारात दहशतवादी हल्ला झाला असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात पाच जण ठार झाले असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यामध्ये चार दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. दहशतवादी हल्ला झाल्याचे समोर आल्यानंतर पाकिस्तान सुरक्षा दलाने शेअर बाजार इमारतीला घेरले आहे. शेअर बाजार इमारतीमधील नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दहशतवादी हल्ल्यात सात जण जखमी झाले असल्याची माहिती आहे.

Advertisements

उपलब्ध माहितीनुसार सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. दहशतवादी हल्ल्यात चार दहशतवादी सामिल असल्याची माहिती सीसीटीव्हीतून समोर आली. हे चारही दहशतवादी सुरक्षा यंत्रणांच्या चकमकीत ठार झाले असल्याची माहिती पाकिस्तानमधील माध्यमांनी दिली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांची पोलिसांचा गणवेश घातला होता. एका वाहनातून आलेल्या या दहशतवाद्यांनी पार्किंगमध्ये शिरकाव केला. त्यानंतर त्यांनी शेअर बाजारावर हल्ला केला. दोन दहशतवादी प्रवेशद्वारावरच ठार झाले. तर, दोनजणांनी इमारतीत घुसखोरी केली. मात्र, मोठा घातपात करण्याआधी त्यांना कंठस्नान घालण्यात आले.

Advertisements
Advertisements

दरम्यान या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी अद्यापही कोणत्या संघटनेने स्विकारली नाही. या हल्ल्यामागे दहशतवादी संघटनेसोबत एखाद्या जहाल बलुच संघटनेने हल्ला केला असावी अशी चर्चा सुरू आहे. मागील काही महिन्यांपासून बलुच प्रातांतील फुटीरतावादी, बंडखोरांविरोधात पाकिस्तान लष्कराची मोहीम सुरू आहे. यामध्ये काही निष्पाप नागरिकांनाही गोवण्यात आला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. एका मोहिमेच्या दरम्यान नागरिकांनी जोरदार विरोध केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या जवानांना पळ काढावा लागला होता.

Leave a Reply

आपलं सरकार