Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraGovtNewsUpdate : राज्यातील धान्य वितरण सुरळीत सुरु : छगन भुजबळ

Spread the love

राज्यातील  52 हजार 437 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जून ते 29 जून पर्यंत राज्यातील 1 कोटी 46 लाख 29 हजार 920 शिधापत्रिका धारकांना 65 लाख 73 हजार 120 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच 29 लाख 91 हजार 755 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले  असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे.  या लाभार्थ्यांना 52 हजार 437 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 19 लाख 97 हजार 550 क्विंटल गहू, 15 लाख 30 हजार 302 क्विंटल तांदूळ, तर 21 हजार 168 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात  अडकलेल्या सुमारे 3 लाख 64 हजार 428 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रतिलाभार्थी प्रतिमहिना 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 1 जूनपासून एकूण 1 कोटी 11 लाख 53 हजार 62 रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 5 कोटी 5 लाख 5 हजार 193 लोकसंख्येला 25 लाख 25 हजार 260 क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.

राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील  उपाययोजनेसाठी ३ कोटी ८ लाख ४४ हजार ०७६ एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या २ महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे जून 2020 मध्ये आतापर्यंत 4 लाख 51 हजार 380 क्विंटल वाटप केले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड १ किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे 2 लाख 99 हजार 314 क्विंटल डाळीचे वाटप केले आहे.

आत्मनिर्भर भारत या योजनेच्या अन्नधान्य लाभ मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी असून त्या अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रती व्यक्ती 5 किलो मोफत तांदुळ दिला जात आहे आतापर्यंत 68 हजार 630 क्विंटल मोफत तांदुळ वितरित केला आहे.

राज्यात 1 जून ते 29 जून पर्यंत 854 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 29 लाख 91 हजार 755 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच एप्रिल ते जून या कालावधीत 87 लाख 75 हजार 532 शिवभोजन थाळ्या वाटप झाल्या आहेत.

राज्यातील स्वस्त धान्य दुकानांतून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याचे वाटप सुव्यवस्थितरित्या होत असल्याबाबत संनियंत्रण करण्यात येत असून, काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य  दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!