लज्जास्पद : नोकरीचे आमिष दाखवत विवाहितेवर सामूहिक बलात्कार , सोबत असलेल्या पतीला दोरीने बांधून ठेवले…

Advertisements
Advertisements
Spread the love

वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेलसुरा  शिवारात  नोकरी देण्याच्या बहाण्याने एका विवाहितेला फार्महाऊसवर बोलावून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घटना घडल्याचे वृत्त आहे. पतीला बांधून सहा नराधमांनी या पीडितेवर अत्याचार केला. या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  22 वर्षीय विवाहित तरुणीला नोकरीचे आमिष देण्यात आले होते याच कामानिमित्ताने आरोपींनी तिला सेलुसरा येथील शेतातील फार्महाऊसवर बोलवण्यात होतं. पीडित तरुणी ही 27 जून रोजी आपल्या पतीसह फार्महाऊसवर पोहोचली होती. तिथे गेल्यावर सहा लोक घटनास्थळावर उपस्थितीत होते.

Advertisements

पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिच्या पतीला बाहेरच बसवण्यात आले होते आणि तिला आतामध्ये बोलवण्यात आले. पतीला यावर संशय आला असता आरोपींनी त्याला धमकी देऊन बाहेरच रोखले आणि दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर एक-एक करून सहाही नराधमांनी पीडितेवर अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपींनी पीडिता आणि तिच्या पतीला कुठेही काही वाच्यता केली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर पीडित तरुणीच्या पतीने देवळी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली परंतु  प्रकरण सावंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्यामुळे पोलिसांनी त्याला सावंगी इथं जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याने सावंगी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून तक्रार दाखल केली.

Advertisements
Advertisements

दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी घटनास्थळावर  धाव घेऊन पंचनामा केला. तोपर्यंत घटनास्थळी देवळी पोलिसांचे एक पथक सुद्धा पोहोचले. पोलिसांना फार्महाऊसवरून आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्यात. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

आपलं सरकार