दुःखद : पतीने चिकन बिर्याणी ऐवजी साधी बिर्याणी आणली आणि तिने संतापाच्या भरात स्वतःला जाळून घेतले…

Advertisements
Advertisements
Spread the love

पतीने चिकनऐवजी साधी  बिर्याणी आणल्याने राग अनावर झालेल्या पत्नीने  स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सौम्या (28) असे  आत्महत्या केलेल्या महिलेचे  नाव आहे. तामिळनाडूतील  मामल्लपुरम येथे ही घटना घडली आहे. या विषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मनोहरन (32) आणि सौम्या (28) मूर्ती बनवण्याचं काम करत होते. घरापासून जवळच असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये एकावर एक फ्री अशी चिकन बिर्याणीची ऑफर सुरू होती. मात्र, मनोहरने  चिकनऐवजी साधी  बिर्याणी आणल्यामुळे सौम्या प्रचंड संतापली. तिने  संतापाच्या भरात अंगावर पेट्रोल टाकून स्वत: ला पेटवून घेत आत्महत्या केली.

Advertisements

‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. दोघांचा 12 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक 10 वर्षांचा मुलगा आणि एक 11 वर्षांची मुलगी आहे. , सौम्या आणि मनोहरनच्या घराजवळ एक नवे रेस्टॉरंट सुरू झाले होते. तिथे एकावर एक फ्री चिकेन बिर्याणीची ऑफर सुरू होती. ही ऑफर पाहून सौम्या हिनं पतीकडे चिकन बिर्याणी आणण्याचा आग्रह धरला. मात्र, मनोहरन हा रेस्टॉरंट गेला तोपर्यंत चिकन बिर्याणी संपली होती. त्यामुळे त्याने  साधी  बिर्याणी आणली. ते पाहून सौम्या नाराज झाली. तिने  साधी  बिर्याणी खाण्यास नकार दिला. कारण तिला चिकन बिर्याणीच खायची होती. यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. नंतर मनोहरन याने  बिर्याणी शेजाऱ्याला दिली. पतीवर नाराज झालेल्या सौम्या हिनं स्वत:ला खोलीत बंद करून घेतलं. नंतर अंगावर पेट्रोल ओतून स्वत: ला पेटवून घेतलं. गंभीर अवस्थेत सौम्याला एका शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Reply

आपलं सरकार