Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Shocking : अमानवी कृत्याचा कळस , कोरोनाबाधिताचा मृतदेह जेसीबीने स्मशानात नेला….!!

Shocking red stamp text on white

Spread the love

सरकारकडून नागरिकांमध्ये  कोरोनाविषयीची जागृती केली जात असतानाही हैद्राबाद मध्ये मात्र अमानवी कृत्याचाकळस गाठण्यात आलं आहे . माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमध्ये  कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका व्यक्तीला चक्क जेसीबी मशीनने स्मशानात नेल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी विशिष्ट मानदंड आणि नियमावली ठरविण्यात आलेली आहे मात्र त्याचे पालन करण्यात न आल्याने हि माहिती मिळताच या शहराचे मनपा आयुक्तांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी चालू असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला जेसीबीमधून घेऊन जाण्यात येत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना आंध्र प्रदेशमध्ये समोर आली आहे. न्यूज एजेंसी IANSच्या म्हणण्यानुसार, ही घटना उदयापुरम परिसरातली आहे. जिथे एका 72 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर PPE किट घातलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला प्लास्टिकमध्ये गुंडाळलं आणि जेसीबी मशीनमध्ये टाकलं. त्यानंतर सगळ्यात धक्कादायक म्हणजे हा जेसीबी थेट स्मशानात न जाता तो आधी एका काम सुरू असलेल्या ठिकाणी मातीचे ढिगारे उचलण्यासाठी गेला आणि त्यानंतर स्मशानात.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीचा हा मृतदेह होता त्याचे  वडिल  स्वत: महापालिका मर्मचारी होते. विशेष म्हणजे तो घरीच मरण पावला. जेव्हा शेजाऱ्यांनी दबाव आणला, तेव्हा मृतदेह काढण्यासाठी महामंडळाला बोलविण्यात आले. या निर्लज्ज घटनेनंतर सध्या डीएम जे निवास यांनी पालिका आयुक्त सी नागेंद्र कुमार यांना निलंबित केले आहे. याशिवाय तेथील सॅनिटरी इन्स्पेक्टर यांनाही हटविण्यात आले आहे. चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!