भारत -चीन मुद्द्यावर पवारांकडून मोदी सरकारची पाठराखण तर राहुल गांधी यांचा घेतला अप्रत्यक्ष समाचार, म्हणाले राजकारण नको….

Advertisements
Advertisements
Spread the love

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारत-चीन दरम्यान झालेल्या संघर्षावरून केंद्र सरकारवर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या म्हणण्यावर भाष्य करताना मोदी सरकारची पाठराखण केली. भारतचे २० सैनिकांचा मृत्यू झटापटीत झाला. चीन-भारत प्रश्न हा संवेदनशील आहे. चीनने गलवान खोऱ्यात कुरापती काढली हेही खरं आहे. मात्र, असे असले तरी भारत-चीन युद्ध होण्याची शक्यता नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. सियाचीनशी संपर्क साधण्यासाठी आपण गलवान खोऱ्यात रस्ता करत आहोत. गलवान खोऱ्यात आपल्याच हद्दीत आपण रस्ता करत असून त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरण्याची सोय करत आहोत. या रस्त्याचं काम सुरू असताना चीनचं सैन्य रस्त्यावर आलं आणि आपल्या सैनिकांसोबत त्यांची झटापट झाली, असे शरद पवार म्हणाले.

Advertisements

या बाबत मोदी यांच्या सरकारवर कुठलीही टीका टिपण्णी न करता , शरद पवार म्हणाले कि , राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आरोप करताना पूर्वी काय घडलं होतं, याचाही विचार केला पाहिजे. १९६२च्या युद्धानंतर चीनने भारताचा ४५ हजार किलोमीटरचा भूभाग बळकावला होता. तो आजही परत मिळालेला नाही, अशी आठवण करून देतानाच राष्ट्राच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करू नका, अशा शब्दांत शरद पवार यांनी राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत.

Advertisements
Advertisements

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. भारत-चीन संघर्षावरून सत्ताधारी आणि काँग्रेस दरम्यान सुरू असलेल्या वाक् युद्धावरही त्यांनी भाष्य केलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कुठलीही टीका केली नाही. याउलट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचीच खिल्ली उडविली . यावर बोलताना पवार म्हणाले कि ,  काल परवा झालेल्या भारत-चीन संघर्षावेळी चीनने भारताचा काही भाग बळकावला ही गोष्ट खरी आहे. किती भूभाग बळकावला हे माहीत नाही. पण १९६२च्या युद्धानंतर चीनने आपला ४५ हजार किलोमीटरचा भूभाग बळकावला होता. तो अजूनही चीनने सोडलेला नाही. ही गोष्ट आपण विसरू शकत नाही, असं सांगतानाच जेव्हा आपण आरोप करतो, तेव्हा पूर्वीच्या काळात मी असताना काय घडलं याचा मी विचार करतो. कारण हा राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यात राजकारण आणता कामा नये, असा सल्ला पवारांनी राहुल गांधी यांना त्यांचे नाव न घेता दिला.

सांगितली स्वतःची आठवण…

भारत-चीन संबंधाबाबत आपली आठवण सांगताना पवार म्हणाले कि , १९९३ मध्ये संरक्षम मंत्री असताना मी चीनला गेलो होतो. त्यावेळी हिमालयीन बॉर्डवर सैन्य कमी करण्याबाबत सहा दिवस चर्चा झाली. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव चीनला गेले आणि त्यांनी दोन्ही बाजूचं सैन्य कमी करण्याचा करार झाला. यावेळी हिमालयीन बॉर्डरवर फायरिंग करायची नाही, असा करार झाला. तशी अंडरस्टँडिंगही झाली. ९३ नंतर १९९५लाही हाच करार झाला. त्यामुळे जेव्हा कधी संघर्ष होतो, तेव्हा दोन्ही बाजूने फायरिंग केली जाते. पण गलवान खोऱ्यात फायरिंग झाली नाही. झटापट झाली. कुणीही गोळीबार केला नाही. तर त्यांच्यात धक्काबुक्की झाली. करारामुळेच या भागात गोळीबार झाला नाही, असं सांगतानाच रस्त्यावर अतिक्रमण करताना चिनी सैन्याला रोखलं, म्हणून झटापट झाली. गस्त घालताना कुणी आडवं आल आणि असा काही संघर्ष झाला तर संरक्षण मंत्र्यांचं अपयश आहे, असं म्हणून चालणार नाही. ते योग्य नाही. झटापट होते, याचा अर्थच तुम्ही जागरूक होता असा होतो. नाही तर चिनी सैन्य कधी आलं आणि गेलं हे कळलंही नसतं असं पवार म्हणाले.

Leave a Reply

आपलं सरकार