Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हृदयद्रावक : कोरोनामुळे हाताला काम नाही मग दूध कुठून आणणार ? तीन वर्षाच्या चिमूरडीची हत्या करून आईनेही घेतला गळफास !!

Spread the love

मुलगी रोज दूध मागते, दूधासाठी हट्ट करते, घरच्या गरीबीमुळे तिला दूध आणून देता येत नसल्याने आईनेच तीन वर्षाच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिनेही गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे.घडली आहे. या घटनेमुळे पालघर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पालघर जिल्ह्याच्या जवाहर परिसरात बुधवारी सकाळी ७ वाजता घडली. सकाळी गावातील लोक कामानिमित्त घराबाहेर पडलेले असताना त्यांना या मायलेकीचा मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मायलेकींनी आत्महत्या केल्याचं कळताच या परिसरात एकच गर्दी झाली. पोलिसांनी अधिक तपास केला असता मृत महिलेचं नाव मंगल दिलीप वाघ (३०) असं आहे.

पोलसांनी आणि ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार मंगल ही आदिवासी महिला असून गावात कुटुंबासोबत राहत होती. तिचा नवरा रोजंदारीचं काम करतो. कोरोना व्हायरस आणि त्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने सर्व कामे ठप्प झाली आहे. त्यामुळे तिच्या नवऱ्यालाही कामे मिळत नसल्याने या कुटुंबाची परवड होत होती. आधीच आठराविश्व दारिद्र्य त्यात लॉकडाऊनमुळे आलेली उपासमार यामुळे वाघ कुटुंब परेशान होतं. मंगलची तीन वर्षांची मुलगी रोशनी रोज दूध प्यायला मागायची. तिला दूध आणून देण्यासाठीही या कुटुंबाकडे पैसे नव्हते. मंगलला सात वर्षाची आणखी एक मुलगी आहे. तिला काहीही खायला दिले तरी ती शांत राह्यची. पण रोशनी रोज दूधाचा हट्ट करायची. त्यामुळे मुलीची रोजची मागणी पूर्ण करता येत नसल्याने मंगलने आधी रोशनीचा साडीने गळा आवळून तिला ठार केले. त्यानंतर या आईनेही घराबाहेरच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.  दरम्यान, मंगलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. त्यात तिने आत्महत्या केल्याचं आढळून आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Click to listen highlighted text!