MaharashtraNewsUpdate : मोठी बातमी : अखेर सर्वच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द , राज्य शासनाचा निर्णय

Advertisements
Advertisements
Spread the love

अखेर महाराष्ट्रातील व्यवसायिक (Professional) आणि गैर-व्यवसायिक (Non-professional) कोर्स करणाऱ्या अंतिम वर्षातील शेवटची सेमिस्टर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती राज्य  सरकारकडून देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रातील वाढता संसर्ग आणि धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आल्याने आता या वादावर पडदा पडला आहे.

Advertisements

दरम्यान कालच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तर  राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मार्च महिन्यात दहावी-बारावीचे शेवटचे पेपर स्थगित करण्यात आले होते. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार की नाही याबाबत चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात ट्वीट करून माहिती देण्यात आल्याने हा विषय आता निकालात निघाला  आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार