Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : राज्यात दिवसभरात १७५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद, राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.२५ टक्के

Spread the love

राज्यात दिवसभरात १७५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी ९१ मृत्यू हे मागील ४८ तासांमधील, तर उर्वरित ८४ मृत्यू हे मागील कालावधीतील आहेत, सध्या राज्यातील मृत्यूदर ४. ६५ टक्के एवढा आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी येथे दिली. आज राज्यात एकूण नोंद झालेल्या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६३, नाशिक- ३, ठाणे-२, उल्हासनगर-१, मीरा भाईंदर- १, पुणे- १, पिंपरी चिंचवड-१, नंदूरबार-१ आणि औरंगाबाद-१ यांचा समावेश आहे. राज्यात आज दोन हजार ३६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण ७९ हजार ८१५ रुग्ण बरे झाले असून, राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.२५ टक्के इतके आहे. तर, ६५ हजार ८२९ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

करोनामुळे रोज होणाऱ्या मृत्यूंमध्ये श्वसनाचे विकार, रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तसेच दीर्घकालीन आजार असणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट होते आहे. रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांचे तात्काळ विलगीकरण, वाढवण्यात आलेल्या चाचण्या, रुग्णांचे मानसिकता सकारात्मक राहील यादृष्टीने केलेले प्रयत्न यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या राज्यात ५, ५८, ४८८ लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,९०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८,७१,८७५ नमुन्यांपैकी १,५२,७६५ ( १७.५२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!