Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : प्रतीक्षा दहावी बारावीच्या निकालाची…

Spread the love

राज्यातील दहावीचे निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणार असल्याचं संकेत दिले होते. यानुसार आता ही तारीख 27 ते 28 जुलै असण्याची शक्यता आहे.  शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याआधीच तसे संकरीत दिले होते. दरम्यान कोरोना विषाणुंचा संसर्ग राज्यात सुरूच असला तरी त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्ध्यांचे नुकसान होऊ  नये यासाठी, राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी ई-शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतलांय. आणि ज्या विद्यार्थ्यांना ई-शिक्षण घेण्यास अडचणी आहेत अशा विद्यार्थ्यांना दूरदर्शन आणि रेडियोच्या माध्यमातूनही शिक्षण देण्यासाठी सुरवात करत असल्याची माहीती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्यात यावर्षी  सुमारे 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा दिली आहे. 12वीची परिक्षा पूर्ण झाली होती. मात्र 10वीचा भूगोलाचा पेपर राहिला होता. नंतर तो रद्दच करण्यात आला होता. सरकारसमोर पेपर तपासण्याचंही मोठं आव्हान होतं. मात्र आता हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून शेवटच्या टप्प्यात काम आहे. निकालासाठी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा. या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाका. तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता. mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही निकाल पाहता येतील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!