Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

FinancialNewsUpdate : आयकर भरणारांसाठी दिलासादायक बातमी

Advertisements
Advertisements
Spread the love

देशातील आयकर दात्यांना केंद्र सरकारने  मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2018-19 साठी इनकम टॅक्स रिटर्न आयटीआर फाईल करण्याची डेडलाइन वाढवली आहे. आता आयटीआर भरण्यासाठी आणखी एका महिन्याचा कालवधी मिळेल, म्हणजेच हे काम तुम्ही 31 जुलैपर्यंत पूर्ण करू शकता. त्याचप्रमाणे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख देखील वाढवण्यात आली आहे. आता 31 मार्च 2021 पर्यंत हे दोन महत्त्वाचे दस्तावेज लिंक करता येणार आहेत. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे  केंद्र सरकारने याआधी आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयटीआरची अंतिम तारीख वाढवून 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत केली आहे.

Advertisements

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने एका अधिसूचनेच्या माध्यमातून 2019-20 आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयटी अधिनियमाच्या अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी विभिन्न गुंतवणुकीची डेडलाइन 31 जुलै, 2020 पर्यंत वाढवली आहे. सीबीडीटीने नुकतच असेसमेंट वर्ष 2020-21 साठी इनकम टॅक्स रिटर्न फॉर्म 1 पासून 7 पर्यंत नोटिफाइड केले होते.  दरम्यान, करदात्यांना सेल्फ असेसमेंट करण्याची तारीख वाढवण्यात आलेली नाही, ज्यामध्ये सेल्फ असेसमेंट टॅक्स लायबिलिटी 1 लाखापेक्षा जास्त आहे. या परिस्थिती आयकर अधिनियम 1961 मध्ये निर्दिष्ट केलेल्या तारखांपर्यंत पूर्ण सेल्फ असेसमेंट टॅक्स द्यावा लागेल आणि विलंबित देयावर आयटी आयकर कायदा कलम 234 अंतर्त व्याज देखील द्यावे लागेल.

Advertisements
Advertisements

आयटी कायद्याच्या Chapter-VIA-B अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी विभिन्न गुंतवणुकीची तारीख ज्यामध्ये 80C (LIC, PPF, NSC आदि), 80D (मेडिक्लेम), 80G (Donation) इत्यादी वाढवून 31 जुलै 2020 करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष 2019-20 साठी या सेक्शन अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी 31 जुलै पर्यंत गुंतवणूक/पेमेंट केले जाऊ शकते. 2019-20 साठी इनकम टॅक्स रिटर्नची शेवटची तारीख 31 जुलै 2020 वरून 30 नोव्हेंबर 2020 करण्यात आली होती. तर टॅक्स ऑडिटची तारीख 31 ऑक्टोबर करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!