AurangabadNewsUpdate : दिवंगत मुख्यवनरक्षकाचे चंदनाचे झाड चोरून नेणारे चोरटे अखेर जेरबंद… !!

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – फेब्रुवारी महिन्यात गारखेडा परिसरातील निवृत्त मुख्यवनसंरक्षक दिवंगत ओमप्रकाश चंद्रमोरे यांच्या अंगणातील ३० हजार रु.किमतीचे चंदनाचे झाड चोरुन नेणारा चोरटा एपीआय घन्नशाम सोनवणे यांनी पकडला. या चोरट्याला आपणच पकडणार असे वचन गुन्हा दाखल झाल्यानंतर एपीआय सोनवणे यांनी आपल्याला दिले होते, अशी प्रतिक्रिया निवृत्त पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी दिली.


अनिल साहेबराव पुंगळे(३२) असे अटक चोरट्याचे नाव आहे.तो रेकाॅर्डवरील चोरटा असून यापूर्वीही अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. ओमप्रकाश चंद्रमोरे हे वनविभागात मुख्यवनसंरक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना वृक्ष लागवडीची आवड होती. विविध वृक्षांची लागवड त्यांनी आपल्या घराच्या अंगणात केली होती. त्यांनी लावलेले झाड मोठे झाल्यानंतर आरोपी पुंगळे याने ते फेब्रुवारी महिन्यात तोडून नेले.या प्रकरणी दिवंगत चंद्रमोरे यांच्या मुलाने पुंडलिकनगर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वीच निवृत्त पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी हे झाड त्यांच्या वडिल बंधूंनी लावलेले आहे. या झाडात भावना गुंतलेल्या आहेत. या चोरीचा तपास लागावा अशी अपेक्षा प्रेमसागर चंद्रमोरे यांनी व्यक्त केली. ही अपेक्षा व्यक्त करतांना ते भावनाविवश झाले होते. त्यावेळेस एपीआय सोनवणे यांनी या चोरीचा तपास आपणच लावून तुमचे झाड तुम्हाला मिळवून देऊ असे सांगितले होते. आज हा तपास पूर्ण झाल्यानंतर निवृत्त पोलिस निरीक्षक चंद्रमोरे यांनी वरील माहिती “महानायक” शी बोलतांना दिली.

Advertisements

हा तपास सुरु असतांना पडेगावात चंद्रमोरे यांच्या अंगणातील चंदनाचे झाड चोरणारा चोरटा अनिल पुंगळे राहतो अशी माहिती खबर्‍याने एपीआय सोनवणे यांना दिली. त्याच्याकडे बनावट ग्राहक पाठवून आरोपी पुंगळे ने लपवलेले चंदनाचे खोड २ हजार रु.कि. अशा दराने विकण्याची तयारी दाखवली त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने तयार केलेल्या बनावट ग्राहकाने आरोपी पुंगळेला बुधवारी रात्री ९ वा.शिवाजीनगर परिसरात बोलावले. तो येताच त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील मुख्यआरोपी चंदनाच्या मूळ गाभ्यासहित फरार असल्याचे पुंगळेला ताब्यात घेतल्यावर उघंड झाले. वरील कारवाईत पीएसआय प्रभाकर सोनवणे, पोलिस कर्मचारी रमेश सांगळे, जालिंदर मांटे , बाळाराम चौरे, विलास डोईफोडे, निखील खराडकर यांंनी सहभाग घेतला होता. पुढील तपास एपीआय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुंडलिकनगर पोलिस करंत आहेतत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार