AurangabadNewsUpdate : कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकप्रतिनिधींशी चर्चा

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्वतोपरी उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद प्रशासनास दिले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी औरंगाबाद येथील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, सर्वश्री खासदार डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाठ, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची उपस्थिती होती. तसेच मुंबईहून मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, डॉ. शशांक जोशी आदी उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.

Advertisements

औरंगाबादेत कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी प्रशासनाला आवश्यक असणाऱ्या सर्व त्या उपाययोजना करा, शासन खंबीरपणे प्रशासनाच्या पाठीशी आहे, असे ठाकरे यावेळी म्हणाले.  पालकमंत्री सुभाष  देसाई यांनी औरंगाबादेत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच घाटीतील औषध पुरवठा, सुपरस्पेशालिटीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्धतेसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले. खासदार डॉ. कराड यांनी घाटीतीतील सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी केली. तर खासदार जलील यांनी घाटीतील औषध पुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना केली. तसेच सर्व आमदारांनी विविध सूचना करत प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मत मांडले. यावेळी  मेहता, डॉ. व्यास, डॉ. जोशी यांनीही मागदर्शन केले. तर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि करावयाच्या उपाययोजना याबाबत सुनील  केंद्रेकर यांनी माहिती दिली. तसेच श्री. चौधरी यांनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार