Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : कोणाचे काय तर कोणाचे काय ? पाच लाखाची लाच घेताना फौजदार चतुर्भूज

Spread the love

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चिखली पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाला तब्बल पाच लाख रुपयांची लाच घेताना एसीबी अर्थात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. फारुख याकूब सय्यद सोलापूरे  असं या 53 वर्षीय  उपनिरीक्षकाचे नाव आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फारुख सोलापूरे हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत चिखली पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याला येथील साने चौकीत नेमणूक देण्यात आली होती.

या बाबतची अधिक माहिती अशी कि,   या प्रकरणातील तक्रारदार यांनी बांधकाम केलेल्या इमारतीमधील सहा सदनिका विकल्या होत्या. त्या सदनिकाधारकांकडून काही पैसे येणे बाकी होते. हे पैसे मिळावेत यासाठी तक्रारदाराने चिखली पोलीस ठाण्यात 29 मे 2020 रोजी अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी करण्याचे काम उपनिरीक्षक सोलापूर यांच्याकडे होते. गैरअर्जदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी आरोपी सोलापूर याने तक्रारदारांकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, सापळा रचण्यात आला होता. फारुख याकूब सय्यद सोलापूरे हे पडताळणीसाठी 5 लाख घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!