Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PkistanNewsUpdate : भारतीय उच्चायोगाच्या दोन कर्मचाऱ्यांची अखेर सुटका, अपघातामुळे होते पोलिसांच्या ताब्यात…

Spread the love

सोमवारी सकाळी इस्लामाबादहून  अचानक बेपत्ता झालेले भारतीय उच्चायोगाच्या दोन कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या भारतीय दूतावासाकडे सोपवण्यात आलं आहे. सोमवारी सकाळी इस्लामाबादहून हे दोन कर्मचारी अचानक बेपत्ता झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर हे दोघे इस्लामाबाद पोलिसांच्या ताब्यात असल्याचं सांगण्यात आलं. इस्लामाबादहून बेपत्ता झालेल्या या दोन भारतीय उच्चायोगाच्या कर्मचाऱ्यांना रस्ते अपघाताच्या प्रकरणात अटक करण्यात आल्याचं समोर आलं होतं.

दरम्यान पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, दूतावासाजवळ एका नागरिकाला भारतीय उच्चायोग अधिकाऱ्यांच्या गाडीची धडक लागली होती. त्यानंतर इस्लामाबाद पोलिसांनी या अधिकाऱ्यांना ‘हिट अँड रन’ प्रकरणात अटक केली होती. मात्र याबाबत पाकिस्तानी पोलिसांनी कोणताही खुलासा न केल्यामुळे  दोन्ही देशांत पुन्हा एकदा तणाव वाढला होता. दरम्यान, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून या दोघांचं अपहरण करण्यात आल्याची शंकाही उपस्थित केली जात होती. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीनं दिलेल्या माहितीनुसार, दूतावासाजवळच्या रस्त्यावर भारतीय उच्चायोगाच्या कर्मचाऱ्यांकडून बीएमडब्ल्यू कारची एका पाकिस्तानी नागरिकाला धडक लागली होती. अपघातानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्थानिक नागरिकांकडून भारतीय दूतावासाच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं.

सोमवारी सकाळी सीआयएसएफचे दोन वाहन चालक ड्युटीसाठी बाहेर गेले होते. मात्र, ते दोघेही इच्छित ठिकाणी पोहचले नाहीत. या दोघांचे अपहरण झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु, आता मात्र त्यांना इस्लामाबादमध्ये अटक झाल्याचे सांगण्यात येत असले तरी  इस्लामाबाद पोलिसांनी आंतरराष्ट्रीय कायदे धाब्यावर बसवत भारतीय दूतावासाच्या कर्मचाऱ्यांना कथितरित्या अटक केली होती. डिप्लोमॅटिक कायद्यानुसार, कोणत्याही देशाला इतर देशाच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यापूर्वी त्या देशाच्या दूतावासाला यासंबंधी माहिती देणं गरजेचं असतं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!