Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पंतप्रधान , मुख्यमंत्री , राजनाथसिंग यांच्यासह अनेकाकांकडून सुशांत सिंह राजपूतला भावपूर्ण आदरांजली

Spread the love

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत ने बांद्रा येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर सिनेसृष्टीबरोबर सर्वच क्षेत्रात खळबळ उडाली असून एका  प्रतिभावान अभिनेत्याने अचानक एक्झिट केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान  त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसले तरी प्रेस ट्रस्टने दिलेल्या वृत्तानुसार त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी कन्फर्म केले आहे.

‘सुशांत सिंह राजपूत… एक प्रतिभाशाली तरुण अभिनेता खूप लवकर निघून गेला. त्याच्या अभिनयानं अनेकांना प्रेरणा दिली. आपले शानदार अविस्मरणीय परफॉर्मन्स तो मागे सोडून गेलाय. त्याच्या निधनाच्या बातमीनं धक्का बसला. त्याच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना… ओम शांति’ असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटरून केलंआहे.

सुशांत  ३४ वर्षांचा होता. पोलिसांच्या रिपोर्टनुसार, काल रात्री सुशांतचे काही मित्र त्याच्या घरी होते. आज सकाळी बराचवेळ सुशांतने घरचा दरवाजा उघडला नाही म्हणून त्याच्या घरी काम करणाऱ्या नोकराने दरवाजा तोडला. यावेळी सुशांतचा देह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे वृत्त आहे. छोट्या पडद्यापासून करिअरला सुरुवात करून बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्कं करणाऱ्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत  याच्या बातमीने अनेकांना धक्का दिला. मनोरंजन क्षेत्रासाठी हा धक्का मोठा असला तरी सुशांतच्या प्रेक्षकांनाही या बातमीनं हादरवून टाकले. करिअरमध्ये जोरदार घोडदौड सुरू असताना ३४ वर्षीय सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या का केली? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मनोरंजन क्षेत्रातच नाही तर राजकीय नेत्यांनाही सुशांतच्या मृत्यूच्या बातमीनं धक्का बसलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अशा अनेक नेत्यांनी सुशांतच्या मृत्यूवर आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली आहे.

‘हिंदी सिनेमाचा तरुण कलाकार सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूची बातमी स्तब्ध करणारी आहे’, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केलं आहे .

‘सुशांतच्या मृत्यूच्या बातमीनं धक्का बसला आणि दु:खही झालं. त्याच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना बळ मिळो हीच प्रार्थना’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

शनिवारी रात्री सुशांतचे काही मित्र त्याच्या घरी होते. सकाळी बराच वेळ सुशांतने दरवाजा उघडला नाही म्हणून त्याच्या घरी काम करणाऱ्या नोकराने दरवाजा तोडला. यावेळी सुशांतचा देह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत नैराश्य अवस्थेत होता, असं त्याच्या मित्रांचं म्हणणं आहे. सुशांत नैराश्येवर उपचार घेत असल्याची एक फाईलही पोलिसांना सुशांतच्या घरी सापडली आहे. ‘एमएस धोनी द अनटॉल्‍ड स्‍टोरी’ या सिनेमात एम एस धोनीच्या भूमिकेत दिसलेल्या सुशांतच्या मृत्यूनंतर मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातूनही शोक आणि प्रचंड धक्का व्यक्त करण्यात येतोय.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!