Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विरोधी पक्ष नेत्यांचा सरकारवर मोठा आरोप

Spread the love

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप करताना म्हटले आहे कि , क्षमता असतानाही सरकार चाचण्या करत नाही. राज्याची चाचणी करण्याची क्षमता 38 हजार असताना फक्त 14 हजारच टेस्ट केल्या जात आहेत. तर मुंबईची क्षमता 12  हजार असताना केवळ 4  हजारच चाचण्या केल्या जात आहेत असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस कोकणाचा दौरा करून स्थानिकांशी संवाद साधला. अनेक ठिकाणांना भेटी देऊन नुकसानीचा प्रचंड आढावा घेतला. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशीष शेलार, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, सुनील राणे आदी नेते उपस्थित होते. हेक्टरी मदतीच्या निकषामध्ये बदल करण्यात यावा, मासेमारांसह शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात यावी, मासेमारांना डिझेलचे परतावे तत्काळ देण्यात यावे, वीज नसल्याने बँकांचे व्यवहार ठप्प असल्याने तातडीची मदत रोखीने देण्यात यावी अशा विविध १९ मागण्या त्यांनी या निवेदनातून केल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!