Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

Spread the love

देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरु केलेल्या अनलॉक१ नंतर सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हिड-19 साथीच्या विरोधात सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांची महत्वाची  बैठक बोलावली होती. या बैठकीत कोरोनासंदर्भात राष्ट्रीय पातळीवर कोरोनाच्या स्थितीचा आणि वाढत्या आकड्यांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये दिल्लीसह विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीसाठी गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, आरोग्य सचिव, महासंचालक आयसीएमआर आणि सशक्त गटांचे अन्य संबंधित गट उपस्थित होते.

पंतप्रधानांच्या बैठकी एनआयटीआय आयोगाचे सदस्य विनोद पॉल यांनी सद्यस्थिती आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या परिस्थितीची माहिती सगळ्यांना दिली. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची दोन तृतीयांश प्रकरणं पाच राज्यात असून मोठ्या शहरांमध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं सांगण्यात आलं. मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी कोरोना चाचण्या, बेड आणि आरोग्य सुविधांची संख्या वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला. या बैठकीत, पंतप्रधान मोदींनी रुग्णालयातील बेड, क्वारंटाईन सेंटर यावर चर्चा केली. आवश्यकतेनुसार, आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील अधिकाऱ्यांशी  चर्चा करून आपत्कालीन योजना तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्याची सुरूवात लक्षात घेता योग्य ती तयारी करावी, असा सल्ला पंतप्रधानांनी मंत्रालयाला दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!