Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaVirusUpdate : देशातील रुग्णांच्या समूह संसर्गावर आयसीएमआरने व्यक्त केले हे मत … !!

Spread the love

देशात सर्वत्र करोना संसर्गाची चर्चा असून अनेक रुग्णांमध्ये झालेला संसर्ग नेमका कुणाच्या द्वारे पोहोचला हे समाजाने आता कठीण झाले असून देशात दररोज दहा हजारांहून अधिक नवीन करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या सर्व्हेक्षणानुसार, देशात अजूनही समूह संसर्ग अर्थात कम्युनिटी ट्रान्समिशन झाले नसल्याचे सांगण्यात येत असले तरी  तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आयसीएमआरच्या सर्व्हेक्षणात देशाची सद्य स्थिती स्पष्ट होत नाही. सरकार सत्य परिस्थितीचा स्वीकार करायला तयार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान आयएमसीआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी गुरुवारी सीरोचा सर्व्हे रिपोर्ट जारी केला असून या अहवालात भारतात अद्यापही समूह संसर्गाची स्थिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशात करोना व्हायरसच्या संक्रमणाचा ट्रेन्ड जाणून घेण्यासाठी सीरो सर्व्हे करण्यात आला होता. ६५ जिल्ह्यांत २६,४०० लोकांवर करण्यात आलेल्या या सर्व्हेत एकूण ०.७३ टक्के लोकांना करोना संक्रमणानं ग्रासल्याचं समोर आलं. दरम्यान वायरोलॉजी, सार्वजनिक आरोग्य आणि औषध विभागातील तज्ज्ञांचं म्हणणे  मात्र वेगळेच आहे. ‘एम्स’च्या संचालकपदाची जबाबदारी हाताळलेल्या डॉ. एम. सी. मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, देशाच्या मोठ्या भागात करोनाचा समूह संसर्ग झालेला आहे. मोठ्या शहरांतून पलायन आणि लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानं करोना आणखीन तेजीनं फैलावताना दिसतोय. जिथं एकही रुग्ण नव्हता अशा ठिकाणीही आता हा आजार पोहचलेला आहे त्यामुळे सरकारने  सत्य स्वीकारण्याची वेळल आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना सतर्क केलं जाऊ शकेल, असं मिश्रा यांनी म्हटले आहे.

प्रसिद्ध वायरोलॉजिस्ट शाहिद जमी यांच्या म्हणण्यानुसार, ‘भारत खूप अगोदरपासूनच समूह संसर्गाच्या स्थितीत पोहचलेला आहे. पण सरकार हे मान्य करायला तयारचं नाही. आयसीएमआरनं आपल्या अभ्यासात म्हटल्याप्रमाणे, कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या ४० टक्के रुग्ण ना परदेशात यात्रेवर गेले होते ना ते अन्य कोणत्या करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते. जर याला समूह संसर्ग म्हणायचं नाही तर काय म्हणायचं?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. प्रसिद्ध सर्जन डॉ. अरविंद कुमार यांच्या म्हणण्यानुसार, आयसीएमआरचं म्हणणं मान्यही केलं तरी दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबईसारख्या ठिकाणी समूह संसर्ग फैलावलाय हे सत्य नाकारता येणार नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!