Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaVirusDelhiUpdate : कोरोनाचा संसर्ग थांबेना , गृहमंत्र्यांची उद्या उच्चस्तरीय बैठक

Spread the love

दिल्लीत कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दररोज हजारोंच्या संख्येनं नवीन रुग्ण रुग्णालयात दाखल होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत एक बैठक बोलावली आहे. दिल्लीत कोरोना संक्रमणाच्या वाढत्या धोक्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी उद्या रविवारी सकाळी ११.०० वाजता एक उच्चस्तरीय बैठकीचं आयोजिन केले आहे. या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया, दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्यासहीत गृह मंत्रालयाचे इतर अधिकारीही उपस्थित असतील. या बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA) सदस्यही उपस्थित राहतील.

दिल्लीतील वाढत्या रुग्णांच्या  पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावेळी, दोन्ही नेत्यांत करोना व्हायरस परिस्थितीसंबंधी चर्चाही झाली होती. दिल्लीत ‘आम आदमी पक्षा’चं सरकार असलं तरी केंद्रशासित प्रदेश असल्यानं सरकारला केंद्राशी जुळवून घेऊनच काम करावं लागतं. दिल्लीतील आरोग्य सेवेत केंद्र सरकारचाही हस्तक्षेप दिसतो. कारण दिल्लीतील अनेक रुग्णालय केंद्राच्या अधिकारकक्षेत येतात. सोबतच दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारीही केंद्राची आहे. अशावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सरकारला एकत्र येऊनच परिस्थिती हाताळावी लागणार, हे स्पष्ट आहे. याआधीही सर्वोच्च न्यायालयानंही स्वत:हून हस्तक्षेप करत या प्रश्नावर मार्ग काढण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारला दिले होते.

दरम्यान शुक्रवारी दिल्लीने करोनाबाधित नवीन रुग्णांच्या संख्येनं जुने सगळे रेकॉर्डस तोडलेत. अधिकृत आकडेवारीनुसार, शुक्रवारी दिल्लीत २३१७ नवीन रुग्ण आढळलेत. गेल्या १५ दिवसांतील आकड्यांवर नजर टाकली तर दिल्ली आणि चेन्नईनं मुंबईहून संक्रमणाचा दुप्पट वेग पकडलाय. दिल्लीत अहमदाबादहून तिप्पट रुग्ण आढळले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!