Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiCoronaUpdate : मुंबई सगळ्यात मोठा हॉटस्पॉट, 55 हजारांचा टप्पा पार , दोन हजाराहून अधिक मृत्यू

Spread the love

राज्य सरकारच्या दुष्टीने मुंबई हा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट बनला असून मुंबईतल्या कोरोनाबधितांच्या आकड्याने 55 हजारांचा टप्पा पार केला आहे. मुंबईत एकूण 55 हजार 451 एवढे कोरोना रुग्ण आहेत. तर मृतांच्या आकड्यानेही 2 हजारांचा टप्पा पार केला आहे, मुंबईत आत्तापर्यंत 2044 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात आज 90 जणांचा मृत्यू झाला. राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, अकोला, नागपूर, मालेगाव या शहारांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असून ते आता धोकादायक हॉटस्पॉट बनले आहेत. मुंबईत तर तब्बल 11 लाखांपेक्षा जास्त घरांना सील करण्यात आलं आहे.

मुंबईमध्ये सध्या अशी 11 लाख 30 हजार 765 इतकी घरं आहेत. त्यापैकी झोपडपट्टीतील 9 लाख 50 हजार 578 तर इमारतींमधील 1 लाख 80 हजार 187 इतकी घर सील करण्यात आली आहेत. आणि मुंबईतील जवळपास अर्धा कोटी लोकांना सध्या घराबाहेर पडण्यास परवानगी नाही. या सील केलेल्या या घरांमध्ये राहणारी एकूण लोकसंख्या ही 50 लाख 20 हजार 538 इतकी येते याचा अर्थ असा की पन्नास लाखाहून अधिक लोकांना सध्या तरी कुठे ये जा करतां येणार नाही. मुंबईतील झोपड्या आणि चाळीत सध्या सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह रुग्ण सापडले आहेत. 18957 रुग्ण या 798 झोपड्या आणि चाळीत सापडले आहेत तर 4538 इमारतीमध्ये 9956 असे एकूण 26 हजार 268 ॲक्टिव्ह रुग्ण सापडले आहेत.

राज्याला कोरोना व्हायरसचे हादरे सुरुच आहेत. आजही राज्यात 3493 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्याचा एकूण आकडा 1 लाख 1 हजार 141 वर गेला आहे. तर राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 127 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या  3717वर गेली आहे. आजही मुंबईत सगळ्यात जास्त  90 जणांचा मृत्यू झाला.  दिवसभरात 1718 रुग्ण बरे झाले. तर राज्यात एकूण 47796 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 47.3 एवढं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेले काही दिवस राज्यात 3 हजारांच्या आसपास रुग्ण सापडत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!