Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : मोठी बातमी : लष्करी अधिकाऱ्याच्या मदतीने चालत होता गोरख धंदा, साडेसात कोटींच्या बनावट नोटा जप्त

Spread the love

काळ वेळ कुठलीही असो गुन्हेगार गुन्हा करण्यासाठी थांबत नाहीत हेच खरे.  पुणे शहरातील उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या येरवडा परिसरात विमान नगरातील संजय पार्कमध्ये डॉलरच्या बदलत्या बनावट नोटा देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात लष्करी अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक केली आहे. आरोपींकडे सुमारे 10 कोटी रुपयांची  रोकड सापडली असून त्यात  7  कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा आणि 2 लाख 80 हजारांच्या  रोख रकमेचा समावेश आहे. हि सर्व रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. याशिवाय आरोपीकडे परदेशी चलन आणि बनावट पिस्तूलही सापडलं आहे.

पुणे पोलिसांचे खंडणी विरोधी पथक आणि भारतीय लष्कराने संयुक्त कारवाई केली आहे. सर्व आरोपींना पुढील चौकशीसाठी पुणे क्राईम ब्रॅंचच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. आरोपी डॉलरच्या बदलत्या बनावट नोटा देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुण्याचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांनी सांगितले की, पुणे गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेचेही पोलिसांना सहकार्य मिळालं. विमान नगर येथील संजय पार्कमध्ये पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटांचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका लष्करी अधिकाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यात आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!