Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiUpdate : धक्कादायक : मुंबईतील एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोक कंटेन्मेंट झोनमध्ये…!!

Spread the love

मुंबई शहरातील  कोरोना बाधितांची रुग्णसंख्या ५० हजारांच्यावर वर  गेली असून या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि प्रशासनाने कंबर कसली आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या असलेल्या भागात पालिकेनं कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. मुंबईतील २४ विभागांत एकूण ७९८ कंटेन्मेंट झोन आहेत. यात १८९५७ करोना रुग्ण आढळले आहेत. तर या झोनमधील ४५८८ इमारतींना सील करण्यात आले  आहे. तर, मुंबईतील एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोक कंटेन्मेंट झोनमध्ये राहत आहेत.

दरम्यान महापालिकेने  जाहीर केलेल्या आकडीवारीनुसार, या ७९८ कंटेन्मेंट झोनमध्ये ४२ लाख लोक राहतात. तर, पालिकेने  सील केलेल्या इमारतींमध्ये ८ लाखांहून अधिक लोक राहतात. या आकडेवारीनुसार, १.२५ कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत जवळपास ५० लाख लोक कंटेन्मेंट झोन व सील केलेल्या घरात राहत आहेत. एम पूर्व व आर- उत्तर विभागात १०० हून अधिक कंटेन्मेंट झोन आहेत. एम पूर्व विभागात ११५ कंटेन्मेंट झोन असून तिथे १०२१ करोना रुग्ण आहेत. तर, आर- उत्तर विभागात ११६ कंटेन्मेट झोन आहेत तिथे करोनाचे ३३२ रग्णांची नोंद झाली आहे. सगळ्यात अधिक कंटेन्मेंट झोन ९ डी या विभागात आहेत. तिथे १९१ रुग्ण आहेत. तर, सी विभाग टी विभाग १०-१० कंटेन्मेंट झोन आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!