Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdte : जाणून घ्या देशातील सर्वात टॉप 10 विद्यापीठं आणि महाविद्यालये….

Spread the love

IISc, Banagluru

देशाचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी या वर्षीचे देशातील टॉप १०  महाविद्यालयं, विद्यापीठं आणि शैक्षणिक संस्थांचं रँकिंग जाहीर आहे. या रँकिंगनुसार NIRF India University Ranking List 2020 मध्ये या वर्षी IIT Madras ने बाजी मारली आहे. चौथ्या क्रमांकावर मुंबईच्या IIT चा समावेश आहे. मागील वर्षीप्रमाणे पहिल्या दहा टॉप शैक्षणिक संस्थांमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटीचाच दबदबा आहे. पहिल्या दहा टॉप विद्यापीठांच्या यादीत नवव्या स्थानावर महाराष्ट्रातील  एकमेव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समावेश आहे. तर  डेंटल विभागात पुण्याच्या डी. वाय. पाटील विद्यापीठाचा तिसरा क्रमांक लागला आहे. हे दोन अपवाद वगळता  कुठल्याही विभागात पहिल्या तीन क्रमांकात शिक्षणात अग्रेसर म्हणविणारा  महाराष्ट्र मात्र दिसला नाही.

1 भारतीय विज्ञान संस्थान, बेंगळुरू (IISc, Banagluru -कर्नाटक)

2. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली (JNU, दिल्ली)

3. बनारस हिंदू विद्यापीठ (Banaras Hindu University, Varasnasi- उत्तर प्रदेश)

4. अमृता विश्वविद्यापीठम, कोइम्बतूर (तमिळनाडू)

5. जाधवपूर विद्यापीठ, कोलकाता (पश्चिम बंगाल) 

6. हैद्राबाद विद्यापीठ, (तेलंगणा)

7. कलकत्ता विद्यापीठ (पश्चिम बंगाल)

8. मणिपाल अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, मणिपाल (कर्नाटक)

9. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (महाराष्ट्र)

10. जामिया मिलिया इस्लामिया (नवी दिल्ली)

देशातील टॉप  5 आयआयटी

1. IIT Madras

2. IISc Bangalore

3. IIT Delhi

4. IIT Bombay

5. IIT Kharagpur

देशातील  Top 3महाविद्यालये

1.मिरांडा हाउस, दिल्ली

2. लेडी श्रीराम कॉलेज वुमन, दिल्ली

3. हिंदू कॉलेज, दिल्ली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!