Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यातील रिक्त पालक सचिवांची नियुक्ती

Spread the love

राज्यातील रिक्त झालेल्या जिल्हा पालक सचिव पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव (उद्योग) श्री.बी.वेणूगोपाल; जालना जिल्ह्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्री.पराग जैन-नैनुटिया; परभणी जिल्ह्यासाठी महसूल व वन विभागाचे सचिव श्री.किशोरराजे निंबाळकर; अमरावती जिल्ह्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव श्रीमती आय.ए.कुंदन; मुंबई उपनगरासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव श्रीमती अंशु सिन्हा; गडचिरोली जिल्ह्यासाठी महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव श्री.मनुकुमार श्रीवास्तव आणि धुळे जिल्ह्यासाठी मराठी भाषा विभागाच्या सचिव श्रीमती प्राजक्ता वर्मा यांचा पालक सचिव म्हणून समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!