Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : कुत्र्याला फरफटत घेऊन जाणारा तरुण अखेर अटकेत

Spread the love

औरंगाबाद – सोशल मीडियावर कुत्र्याला मोटारसायकलला बांधून फरफटत घेऊन जाणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची दाखल घेऊन औरंगाबाद पोलिसांना ट्विट केले होते. त्यामुळे या तरुणांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते अखेर क्रांतिचौक पोलिसांनी या तरुणाचा शोध लावून त्याला जेरबंद केले आणि सुटकेचा श्वास टाकला. चिराग राजपाल बिडला(१९) रा. गांधीनगर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी अटक केलेल्या तरुणाने पोलिसांना सांगितले कि , चावा घेतल्याचा राग मनात धरून त्याने हे कृत्य केले होते. सादर तरुण औरंगाबादच्या गांधी नगर भागातील रहिवासी असून त्या  तरुणाने शुक्रवारी दुपारी मोटरसायकलला दोन वर्षीय कुत्र्याच्या पिलाला बांधून फरफटत नेत शिवाजीहायस्कूल च्या मोकळ्या मैदानात फेकून दिले. तेंव्हापासुन ते पिलू सापडलेले नाही. हे प्रकरण असे आहे कि ,  आरोपी चिराग च्या शेजारी राहणार्‍या महिलेने दोन वर्षे वयाचा हा कुत्रा पाळला होता परंतु  तो कोणाचेच ऐकत नव्हता. परिसरातील नागरिकांच्या घरात घूसुन उशा व गाद्या फडात होता त्यामुळे आरोपी त्या पिलाला  पकडण्यास गेला असता त्याला त्याने चावा घेतला म्हणून चिडलेल्या आरोपीने शेजारील १४ वर्षीय मुलाला सोबत घेत  कुत्र्याच्या पिलाला मोटरसायकलला बांधले आणि फरफटंत नेले. दरम्यन त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या कार मधील नागरिकाने या घटनेचा व्हिडीओ  घेतला व तो सोशल फेसबुकवर पोस्ट केला. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या . या प्रकरणी एका श्वान प्रेमी नागरिकाने क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहूल सूर्यतळ यांनी चिराग बिलडा ला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!