MaharashtraNewsUpdate : दिलासादायक : अखेर केंद्राकडून राज्याचा जीएसटीचा हक्काचा वाटा मिळाला

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अनेकवेळा मागण्या केल्यानंतर काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वस्तू आणि सेवा कर भरपाईचे (GST Compensation) ३६४०० कोटी आज केंद्राने सरकारने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित केले असल्याने राज्यांना आता हक्काचा पैसा मिळाला आहे. अर्थखात्याने याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना आज वस्तू आणि सेवा कर भरपाईपोटी ३६४०० कोटी देण्यात आले आहेत. याआधी केंद्र सरकारने गेल्या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीपर्यंत राज्य सरकारांना GST Compensation चे ११५०९६ कोटी वितरित केले होते. गेल्या महिन्यात देखील केंद्र सरकारने १५३४० कोटी जीएसटी भापाई म्हणून वितरित केले होते.

Advertisements

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मुख्यमंत्र्याच्या आढावा बैठकीत राज्याचे जीएसटी भरपाई रक्कम लवकर मिळवी, अशी मागणी केली होती. राज्याचे ‘जीएसटी’पोटी ५०४० कोटी केंद्र सरकारकडून येणे बाकी होते.  एकीकडे केंद्र सरकारला आर्थिक आघाड्यांवर संघर्ष करावा लागत असल्याने GST Compensationचा निधी देण्यास विलंब झाला होता. कर महसुलात घट झाल्याने जीएसटी परतावा देण्याबाबत दिरंगाई झाली होती. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात काहीसा तणाव निर्माण झाला होता. लॉकडाउनमुळे एप्रिल पूर्ण महिना बहुतांश राज्यांमध्ये जीएसटी कर उत्पन्न ९० टक्क्यांनी कमी झाले होते. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, गुजरात, पंजाब , आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांच्या तिजोरीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे केंद्र सरकारने जीएसटी भरपाई लवकरात लवकर द्यावी अशी मागणी या राज्यांनी केली होती.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार