Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : आर्थिक तंगीतून देशातील प्रसिद्ध अॅटलस सायकल कंपनी बंद , एक हजाराहून अधिक कामगार बेकार…

Spread the love

 

देशातील सायकल कंपनी अॅटलसने उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद येथे असणारा कारखाना बंद केला आहे. कंपनीकडून येथील कामगारांना नोटीस पाठवली आहे. त्यामध्ये सायकल कारखान्याच्या मालकाकडे आर्थिक तंगी असल्यामुळे कारखाना बंद करत असल्याचे सांगण्यात आले आहे. सायकल दिनाच्या दिवशीच सायकल तयार करणारे कामगार बेरोजगार झाले आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट करत याबद्दल नाराजी व्यक्त करत सरकारला प्रश्न विचारला आहे.

दरम्यान बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी कामगारांच्या समर्थनात ट्विट केलंय. केंद्र सरकारकडून उद्योगांना आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा होत असताना उत्तर प्रदेशातील अॅटलसचा कारखाना आर्थिक टंचाईने बंद होणं ही चिंतेची बाब आहे. सरकारने तातडीने यावर लक्ष द्यावं, असे मायावती यांनी म्हटले आहे. जागतिक सायकल दिनाच्या दिवशीच अॅटलास सायकलची गाजियाबादमधील फॅक्ट्री बंद झाली आहे. त्यामुळे एक हजारपेक्षा जास्त कामगार बेरोजगार झाले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये पैसे दिल्याचं ऐकलं पण खरं तर कंपन्या बंद होत आहेत. लोकांचा रोजगार वाचवण्यासाठी सरकारने आपल्या योजना आणि धोरणांमध्ये बदल करावा.. असं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं आहे. यामुळे एका झटक्यात एक हजार जण बेरोजगार झाले. यावरून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील भाजपच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने इतके रोजगार दिले आणि करार केले, याचा सरकारने जोरदार प्रचार केला. पण नोकऱ्याच येत नाहीएत तर संपत आहेत, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

या संदर्भात प्रियांका गांधी यांनी  ट्विटमध्ये म्हटले आहे कि , जागतिक सायकल दिनी गाझियाबाद येथील अॅटलस सायकल कंपनीचा कारखाना बंद झाला. यामुळे १ हजारांहून अधिक जणांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक कंपन्यांशी रोजगार निर्मितीसाठी करार केले आणि शेकडो रोजगार दिले, असा दावा सरकारकडून करण्यात येतोय. पण वास्तवात कारखाने बंद पडत आहेत आणि रोजगार संपत आहेत. नागरिकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी सरकारला आपल्या धोरणांमध्ये आणि योजनांमध्ये सुधारणा करावी लागेल, असं प्रियांका गांधी म्हणाल्या. अॅटलसने साहिबाबाद येथील कारखाना अनिश्चित काळासाठी बंद केला. कारखाना बंद झाला आहे हे कामगारांना माहितही नव्हते. नेहमी प्रमाणे कर्मचारी बुधवारी सकाळी कामावर आले. त्यावेळी कारखान्याच्या गेटवर कंपनीच्या व्यवस्थापनाने लावलेली नोटीस बघून त्यांना धक्काच बसला. कारखाना बंद झाल्याने काम करणाऱ्या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळी आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. दैनंदिन साधन समग्रीसाठीही कंपनीकडे पुरेसे पैसे नाहीएत. यामुळे सर्वांना ले ऑफ देण्यात येत आहे. निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत कंपनी कच्चा माल खरेदी करू शकत नाही. अशा स्थितीत कारखाना चालवता येऊ शकत नाही, असं कंपनीने दिलेल्या नोटीसमध्ये म्हटलंय. तर २ जूनपर्यंत आम्ही कामाला येत होतो. तोपर्यंत कुठलीही समस्या नव्हती आणि आम्हाला काहीच कळवण्यात आलं नाही. आणि तीन जूनला अचानक नोटीस दिली गेली. कंपनीच्या व्यवस्थापनाशी कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही, असं कामगारांचं म्हणणं आहे.

साहिबाबाद येथे अॅटलसचा देशातील सर्वात मोठा आणि अखेरचा कारखाना होता. ही कंपनी बंद झाल्याने आता अॅटलस सायकलचे उत्पादन बंद झाले आहे. १९४७ मध्ये भारत-पाक फाळणीनंतर कराचीतून भारतात आलेल्या जानकी दास कपूर यांनी १९५१ अॅटलस सायकल कंपनीची स्थापना केली. कंपनीचा साहिबाबादमधला कारखाना शेवटचा होता. यापूर्वी कंपनीने मध्य प्रदेशातील मालनपूर आणि हरयाणातील सोनीपत येथील कारखाना बंद केलाय. साहिबाबादमधील कारखान्यात सर्वाधिक उत्पादन केले जात होते. इथे जवळपास ४० लाख सायकल बनवल्या जात होत्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!