Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्याचे कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Spread the love

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. २५ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे, रुग्णालयात असतानाही ते कार्यरत होते. काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमात ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. कार्यक्रमात त्यांनी आपली मतंही मांडली होती.

दरम्यान कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात मंत्री म्हणून अशोक चव्हाण यांचा मुंबई आणि नांदेडमध्ये प्रवास सुरू होता. राज्य सरकारच्या अनेक बैठकांना ते उपस्थित राहत होते. तसंच, त्यांचा मतदारसंघ असलेल्या नांदेडमध्येही परिस्थितीची पाहणी करत होते. करोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली होती. त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं होतं. कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आली तेव्हा चव्हाण नांदेडमध्ये होते.

त्यांच्या आधी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि मेजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनाही कोरोनाची बाधा झाली होती त्यांचीही कोरोना संसर्गातून मुक्तता झाली आहे. त्यांच्या नंतर अशोक चव्हाण यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते . शासनाने त्यांना विशेष विमानाने नांदेडहून  मुंबईला जाण्यासाठी व्यवस्था केली होती मात्र केंद्र सरकारच्या नियमानुसार कोवीड १९ च्या रुग्णाला विमानाने जात येणार नाही असे सांगून मुख्य सचिवांनी परवानगी नाकारली होती अखेरत्यांना रुग्णवाहिकेतून त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. इथं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्याचा निर्णय घेतला.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!