Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaMaharashtraUpdate 77793 : In Ward Patients 41393 , राज्यभरात ३३ हजार ६८१ रुग्णांची मुक्तता , जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती

Spread the love

राज्यात आज १३५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २९३३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४१ हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. सध्या राज्यात ४६ शासकिय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख १० हजार १७६ नमुन्यांपैकी ७७ हजार ७९३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६० हजार ३०३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७३ हजार ०४९ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १२३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ६८ (मुंबई ४८, ठाणे ८, नवी मुंबई ६, वसई विरार १, पालघर १, पनवेल १), नाशिक- २५ ( धुळे १, जळगाव २१, नाशिक ३), पुणे- १६ (पुणे ९, सोलापूर ७), कोल्हापूर- २ (कोल्हापूर २) औरंगाबाद-८ (औरंगाबाद ५, जालना १, परभणी २), लातूर- ३ (लातूर १, उस्मानाबाद १, नांदेड १), अकोला-३ (वाशिम २, यवतमाळ १).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८५ पुरुष तर ३८ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७१ रुग्ण आहेत तर ४४  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १२३ रुग्णांपैकी ९२ जणांमध्ये (७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २७१० झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू  ३० एप्रिल ते १ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ९३ मृत्यूंपैकी मुंबई ४०, जळगाव -१६, ठाणे ८, सोलापूर -६,  नवी मुंबई -५, रायगड -३, परभणी २, नाशिक २, वाशिम -२ , औरंगाबाद -२,पनवेल १, पालघर -१ , वसई विरार -१ उस्मानाबाद -१, धुळे -१,नांदेड १ आणि यवतमाळ – १ असे मृत्यू आहेत.

 

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह  रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (४४,९३१), बरे झालेले रुग्ण- (१८,०९६), मृत्यू- (१४६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२५,३६४)

ठाणे: बाधित रुग्ण- (११,४२०), बरे झालेले रुग्ण- (४१७९), मृत्यू- (२५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (६९८७)

पालघर: बाधित रुग्ण- (१२३४), बरे झालेले रुग्ण- (४५८), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (७४०)

रायगड: बाधित रुग्ण- (१२९३), बरे झालेले रुग्ण- (७०४), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह  रुग्ण- (५३२)

नाशिक: बाधित रुग्ण- (१२९७), बरे झालेले रुग्ण- (९४२), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२८४)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१७०), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (९०)

धुळे: बाधित रुग्ण- (१८७), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (६७)

जळगाव: बाधित रुग्ण- (८५२), बरे झालेले रुग्ण- (३६२), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३९५)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३९), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (७)

पुणे: बाधित रुग्ण- (८८२५), बरे झालेले रुग्ण- (४७७४), मृत्यू- (३७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३६७५)

सोलापूर: बाधित रुग्ण- (११२५), बरे झालेले रुग्ण- (४५७), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (५७६)

सातारा:  बाधित रुग्ण- (५८४), बरे झालेले रुग्ण- (२१२), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३५०)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६१२), बरे झालेले रुग्ण- (२६०), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३४६)

सांगली: बाधित रुग्ण- (१२७), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (५२)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (१७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (७०)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (३२९), बरे झालेले रुग्ण- (१२३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२०१)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१७१४), बरे झालेले रुग्ण- (१११९), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (५०६)

जालना: बाधित रुग्ण- (१५९), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (८४)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१९४), बरे झालेले रुग्ण- (१४६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४८)

परभणी: बाधित रुग्ण- (७५), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४६)

लातूर: बाधित रुग्ण- (१३१), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (५५)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (९६), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४८)

बीड: बाधित रुग्ण- (५१), बरे झालेले रुग्ण- (२९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह  रुग्ण- (२१)

नांदेड: बाधित रुग्ण- (१५७), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४८)

अकोला: बाधित रुग्ण- (६७९), बरे झालेले रुग्ण- (३८५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२६०)

अमरावती: बाधित रुग्ण- (२७२), बरे झालेले रुग्ण- (१५८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (९८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१५५), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (५४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३१)

वाशिम: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१)

नागपूर: बाधित रुग्ण- (६६२), बरे झालेले रुग्ण- (४१०), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२४१)

वर्धा: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४)

भंडारा: बाधित रुग्ण- (३८), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२४)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (५०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१८)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२८), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (१९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२१)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६४), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४६)

एकूण: बाधित रुग्ण-(७७,७९३), बरे झालेले रुग्ण- (३३,६८१), मृत्यू- (२७१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टिव्ह  रुग्ण-(४१३९३)

(टीप-आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या ९३ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३८०४ झोन क्रियाशील असून आज एकूण १९ हजार १३२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ७२.३७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!