AurangabadNewsUpdate 1769 : जिल्ह्यात 1126 कोरोनामुक्त, 551 रुग्णांवर उपचार सुरू , एकूण मृत्यू 92

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1126 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 551 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 65 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 1769 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. बेगमपुरा (2), लेबर कॉलनी (1), पडेगाव (1), बायजीपुरा (1),हर्सुल परिसर (1), भारतमाता नगर (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), रोशन गेट (2), देवळाई चौक परिसर (1), समर्थ नगर (1), शिवशंकर कॉलनी (5), शिवाजी कॉलनी (1), सईदा कॉलनी (1), चेतना नगर (2), एन-सात सिडको (1), एन-2विठ्ठल नगर (1),विनायक नगर, जवाहर कॉलनी (1), बारी कॉलनी (1), हनुमान नगर, गारखेडा (1), मील कॉर्नर (1), एन चार (1), क्रांती नगर (1),विजय नगर, गारखेडा (1), एन सहा संभाजी कॉलनी (6), अयोध्या नगर (1), न्यू हनुमान नगर (1), कैलास नगर (1), अजिंक्य नगर, गारखेडा (3),एन 1,सिडको (1), सुंदर नगर, पडेगाव (1), गणेश कॉलनी (2), एन चार , समृद्धी नगर,सिडको (2), कटकट गेट, नेहरू नगर (1), आंबेडकर नगर, एन -7 (3), जय भवानी नगर (1), राजा बाजार (4), इंदिरा नगर (1), रोहिदास नगर (1) अन्य (6) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 27 महिला आणि 38 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

Advertisements

आतापर्यंत 1126 जण कोरोनामुक्त

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) 07, जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) 06 रूग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आतापर्यंत एकूण 1126 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

Advertisements
Advertisements

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) रोशन गेट येथील कोरोनाबाधित असलेल्या 85 वर्षीय पुरूष यांचा तीन जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये समता नगरातील कोरोनाबाधित असलेल्या 43 वर्षीय पुरूष रुग्णाचा 03 जून रोजी सायंकाळी सहा वाजता, कैसर कॉलनीतील 64 वर्षीय पुरूष असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा संध्याकाळी 11.15 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आज रोशन गेट येथील 50 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचाही याच रुग्णालयात सकाळी 8.30 वाजता मृत्यू उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे आतापर्यंत घाटीत 71, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 19, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 92 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

आपलं सरकार