#NisargaCycloneUpdate : अलिबाग मध्ये निसर्ग चक्रीवादळाचा पहिला बळी

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्रावर सध्या निसर्ग चक्रीवादळाचे संकट आहे. निसर्ग चक्रीवादळ मुंबईचा किनारा पार करून पुढे गेले आहे. त्यामुळे मुंबईचा मोठा धोका टळला आहे. सोसाट्याचा वार, झाडांची पडझड आणि पाऊस असे त्याचे स्वरुप होते. दुपारी १ वाजता अलिबागला धडकलेले चक्रीवादळ सध्या ठाणे जिल्ह्यात आहे. मुंबईपासून हे वादळ दूर गेले असले तरी रात्री निसर्गचा जोर ओसरणार असून सकळपर्यंत हे वादळ शांत होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे रात्रीपर्यंत अलर्ट कायम आहे. चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागले आहे. नाशिक, मालेगाव, नंदुरबारला आता चक्रीवादळाचा धोका आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या गुजरातच्या जिल्ह्यांनादेखील रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान चक्रीवादळामुळे रायगड, मुंबई, ठाणे, पुण्यात अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

Advertisements

– निसर्ग चक्रीवादळाचा पहिला बळी अलिबाग मध्ये गेलाय . अलिबाग मधल्या उमटे गावातल्या 58 वर्षांच्या दशरथ वाघमारे यांच्यावर वीजेचा खांब पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय . जोराच्या वाऱ्यांमुळे वाघमारे यांच्यावर वीजेचा खांब कोसळला आणि त्यात ते जखमी झाले . त्याना उपचारासाठी रुग्णालयत नेत असताना त्यांचा मृत्यु झाला.

– वादळाच्या पार्श्वभूमीवर कुलाबा येथील महापालिकेच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आलेल्या ३ हजार नागरिकांच्या व्यवस्थेची जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केली पाहणी

– निसर्ग वादळाचा मुंबईला असलेला धोका टळला असला तरी रात्रीपर्यंत अलर्ट कायम

– महावितरणच्या सर्व ग्राहकांना आवाहन… वादळाच्या तडाख्यामुळे आपल्या परिसरात इलेक्ट्रिक खांब कोसळला असल्यास, वीज वाहिनी तुटल्यास किवा रोहित्र जळाल्यास महावितरणचा टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ३४३५ / १८०० १०२ ३४३५ / १९१२ वर त्वरित संपर्क साधावा.

– अहमदनगर: निसर्ग वादळाचा नगर जिल्ह्यातही फटका, अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब पडले. अनेक भागांत वीज पुरवठा खंडित

– मुंबई विमानतळ ६ वाजता सुरू होणार. विमानांच्या ये-जा करण्याला परवानगी

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात, मदत व बचावकार्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश

आपलं सरकार