#धक्कादायक : सोशल मीडियावर फोटो व्हायरल केल्याने झाडाला बांधून तरुणाला जिवंत जाळले

Advertisements
Advertisements
Spread the love

उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात, मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तसेच, तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने तिच्या कुटुंबीयांनी, २२ वर्षीय तरुणाला झाडाला बांधून, बेदम मारहाण करून, त्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी जाळपोळ केली.

Advertisements

प्रतापगड जिल्ह्यातल्या फतनपूर परिसरातील भुजेनी गावात सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. हत्या झालेल्या तरुणाचे नाव अंबिका प्रसाद पटेल (वय २२) आहे. मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तिच्या कुटुंबीयांनी त्याला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला जिवंत जाळले. तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर काही वेळातच घटनास्थळी संतप्त ग्रामस्थांच्या जमावाने एकत्रित येऊन जाळपोळ केली. काही वेळाने पोलिसांनी घटनास्थळी येऊन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी जमावाने पोलिसांची दोन वाहने पेटवून दिली. तसेच पोलिसांवर दगडफेकही केली. हिंसक झालेल्या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी परिसरातील इतर पाच पोलीस ठाण्यांतील कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि जमावाला पांगवले. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पोलिसांनी अंबिका याचा मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आरोपी हरिशंकर आणि शुभम याला अटक केली आहे. तसेच हिंसाचार घडवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबिकाच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या डोक्यावर आधी जड वस्तूने प्रहार करण्यात आला. त्यानंतर त्याला झाडाला बांधले आणि पेटवून दिले.

Advertisements
Advertisements

प्रतापगडचे पोलीस अधीक्षक अभिषेक सिंह यांनी सांगितले की, अंबिका पटेल याचा मुलीच्या कुटुंबीयांशी वाद झाला होता. या आधी संबंधित मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी आणि छेडछाड केल्याप्रकरणी अंबिकाला तुरुंगात जावे लागले होते. एप्रिलमध्ये त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

आपलं सरकार